Rahul Gandhi Belgium Saam TV
देश विदेश

Rahul Gandhi Belgium: मोदी सरकारच्या या निर्णयाचं राहुल गांधींनी केलं समर्थन, म्हणाले- मला वाटतं विरोधक...

Rahul Gandhi On Modi Government: मोदी सरकारच्या या निर्णयाचं राहुल गांधींनी केलं समर्थन, म्हणाले- मला वाटतं विरोधक...

Satish Kengar

Rahul Gandhi On Modi Government:

काँग्रेस खासदार राहुल गांधी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. बेल्जियममध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल यांनी मोदी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ते म्हणाले की, रशिया-युक्रेन युद्धाबाबत सरकारच्या निर्णयाशी विरोधी पक्ष सहमत आहेत.

मोदी सरकारच्या कोणत्याही निर्णयाला राहुल गांधींसह विरोधी पक्षांचे नेते सहमती देतात किंवा पाठिंबा देतात, असे क्वचितच पाहायला मिळते.

राहुल गांधी म्हणाले, “मला वाटते की विरोधक, रशिया आणि युक्रेनमधील संघर्षावर भारताच्या सध्याच्या भूमिकेशी सहमत असतील. आमचे रशियाशी संबंध आहेत. सरकार सध्या जे करत आहे, त्यापेक्षा विरोधक वेगळी भूमिका घेतील, असे मला वाटत नाही.  (Latest Marathi News)

पत्रकारांनी त्यांना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांना दिल्लीतील जी-20 परिषदेचे निमंत्रण न देण्याबाबत विचारले असता, राहुल गांधी म्हणाले, "त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्याला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून कळतं की, ते भारताची 60 टक्के लोकसंख्याच्या नेत्याला महत्त्व देत नाही. याबद्दल लोकांनी विचार केला पाहिजे. त्यांना हे करण्याची गरज का भासत आहे आणि त्यामागील विचार काय आहे.

दरम्यान, यापूर्वी जून महिन्यातही राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात रशिया-युक्रेन युद्धाबाबत केंद्र सरकारच्या भूमिकेचे समर्थन केले होते. वॉशिंग्टन येथील नॅशनल प्रेस क्लबमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले होते की, "रशियाबाबतच्या धोरणाबद्दल मीही तेच उत्तर देईन जे भाजपने दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT