Anurag Thakur saam tv
देश विदेश

मुंबईत महिला खेळाडूंना शौचालय नाहीत, ही दुर्दैवी बाब : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबई महापालिकेकडे सर्वाधिक कर संकलन आणि बजेट प्रणाली आहे. तरीही इतक्या मोठ्या शहरात शौचालयाची सोय नसल्याने महिला आणि वृध्द नागरिकांना परिणाम भोगावे लागतात, ही दुर्दैवाची बाब आहे. महानगरपालिकेने (BMC) खेळाकडे आणि महिला खेळाडूंकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. आम्ही शहराचे सौंदर्यीकरण आणि खेळांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रीत करू, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी दिली आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Central Minister anurag thakur bmc authorities)

अनुराग ठाकूर यांनी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले.अनुराग ठाकूर हे सध्या दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. आज दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाकूर म्हणाले,महानगरपालिकेने खेळाकडे आणि महिला खेळाडूंकडे दुर्लक्ष केले आहे.आम्ही शहराचे सौंदर्यीकरण आणि खेळांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करू.

मुंबई शहराच्या विकासाकरिता आणि नवी धोरणे सुरू करण्यासाठी योग्य आराखडा तयार केला जात आहे. भारतात चित्ता आणण्याबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर उत्तर देताना ठाकूर म्हणाले,काँग्रेस कोणत्याही विषयाला कुठेही जोडत आहे.भारत आज स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी बनत आहे.भारताबाहेर निर्यातही वाढली आहे.देशात रोजगारही वाढत आहे.त्यामुळे या टीकेला काहीही अर्थ उरत नाही.मुंबई महानगरपालिकेने छोट्या व्यावसायिकांकडेही दुर्लक्ष केले आहे. येणाऱ्या काळात केंद्राच्या योजनेतून लघू उद्योजकांसाठी ठोस काम केले जाईल, असंही ठाकूर म्हणाले.

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या भेटीबाबत बोलताना ठाकूर म्हणाले, भेटीबाबत कोणत्याही प्रकारचे राजकारण आणण्याची आवश्यकता नाही.आम्ही आगामी निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली लढवणार आहोत. भाजपच्या वतीने सर्व मतदारसंघात सुरू असलेल्या या दौऱ्याचा शिवसेना -भाजपा युतीला फायदाच होईल, असही ते म्हणाले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर,आमदार कॅप्टन तमिळ सेलवन,आमदार प्रसाद लाड,राजेश शिरवाडकर,श्वेता परुळकर,सतीश निकम,राजेश सिंग,ओमप्रकाश चौहान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit: महाराष्ट्र हरलास तू ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी पोस्ट, म्हणाली...

Dharmarao Baba Atram: शरद पवारांचं राजकारण संपलं, विजयी होताच धर्मराव बाबा आत्राम यांचं विधान

Belapur : संदीप नाईकांचा 377 मतांनी निसटता पराभव, अपक्ष संदीप नाईकांना 513 मते, तुतारीसारख्या ट्रम्पेटलाही भरघोस मते

Yashasvi Jaiswal: पर्थवर यशस्वी जयस्वाल नावाचं तुफान; कांगारू गोलंदाजांची धुलाई करत ठोकलं शतक

Maharashtra News Live Updates: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना लवकरच महायुती सामोरे जाणार

SCROLL FOR NEXT