Modi Government Saam Tv
देश विदेश

Modi Government: लाडक्या बहिणींना मिळणार स्कूटी? केंद्र सरकार मुलींना स्कूटी देणार, काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Central Government Give Bike To Girls: सोशल मीडियावर एक मेसेजवर व्हायरल होत आहे. यात मुलींनी केंद्र सरकारकडून बाईक दिल्या जाणार असल्याचा दावा केला जात आहे.

Sandeep Chavan

लाडक्या बहिणींना आता सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे. हे आम्ही म्हणत नाहीये तर सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होतोय. खरंच सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे का? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं. चला पाहुयात.

लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मिळाल्यानंतर आता स्कूटी मिळणार? सरकार मुलींना आता स्कूटीसाठी पैसे देणार? मुलींना आता स्कूटी मिळणार असा दावा सोशल मीडियावर करण्यात आलाय.या सोशल मीडियावरील मेसेजमध्ये पाहा. आता लाडक्या बहिणींना पैशांप्रमाणे स्कूटीसाठी पैसे देण्याचा दावा केलाय.पण, हे खरंय का? याचीच आम्ही सत्यता जाणून घेणार आहोत.

लाडक्या बहिणींना स्कूटी मिळणार असा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, मुलींना आता स्कूटी मिळणार असेल तर ती कशी मिळणार.? त्यासाठी अर्ज कुठे करायचा? आणि स्कूटीसाठी पैसे कुणाला मिळणार? हे पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली.त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

मोफत स्कूटी योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी 65 हजार रुपये मिळणार आहेत. हा मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे.त्यामुळे या मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने पडताळणी केली. याबाबत माहिती सरकारच्या साईटवर आहे का? हे आधी आम्ही जाणून घेतलं.तसंच सरकारने अशी कोणती योजना केलीय का? याबाबत माहिती जाणून घेतली. त्यावेळी काय सत्य समोर आलं.पाहुयात.

व्हायरल सत्य/साम इन्व्हिस्टिगेशन

लाडकींसाठी केंद्राची स्कूटी वाटपाची योजना नाही

सरकार मुलींना स्कूटीसाठी 65 हजार देणार हे खोटं

लाडकींना फसवण्यासाठी सोशल मीडियावर मेसेज व्हायरल

मेसेज पाहून त्यावर लगेच विश्वास ठेवू नका

योजनेसाठी कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.

हा मेसेज मुलींची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल केला जातोय. अर्ज भरण्यासाठी लिंकही पाठवल्या जातात. त्यामुळे लिंकवरही क्लिक करू नका, नाहीतर तुमची फसवणूक होईल. आमच्या पडताळणीत मुलींना सरकार आता स्कूटी घेण्यासाठी 65 हजार रुपये देणार असल्याचा दावा असत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

SCROLL FOR NEXT