Old Pension Scheme  Saam TV
देश विदेश

Old Pension Scheme: सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार का? मोदी सरकारने स्पष्टच सांगितलं

Latest update on Old Pension scheme: सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार का, याविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेबाबत मोदी सरकारने स्पष्टच सांगितलं आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निराशजनक बातमी समोर आली आहे. जुनी पेन्शन योजना लागू होणार का, याबाबतचं महत्वाचं वृत्त समोर आलं आहे. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याची माहिती समोर आली आहे. या वृत्ताने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. जुन्या पेन्शन योजनेची आशा असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा मोठा हिरमोड झाला आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. या अहवालादरम्यान जुनी पेन्शन योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

मोदी सरकारने जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने लेखी उत्तरात जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे. याच जुन्या पेंशन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता.

जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून करण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना जुन्या पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत. सरकारच्या या उत्तराने त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर सराकारी कर्मचारी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे. तसेच या योजनेबाबतच्या सरकारच्या भूमिकेनंतर विरोधक काय भूमिका याकडेही साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Vrat : महाराष्ट्रात श्रावण कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या कोणते व्रत कोणत्या दिवशी करावे

Beed : दोन वर्षांपासून शिक्षक नाही; शाळेला कुलूप ठोकत गावकऱ्यांचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Maharashtra Live News Update : वर्ध्यात यशोदा नदीला पूर; गावांचा संपर्क तुटला

Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू, कुजलेल्या अवस्थेत घरात आढळला मृतदेह

आकाशवाणी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला का चोपलं? शिंदेंच्या आमदाराने सांगितला सगळा घटनाक्रम; म्हणाले, पाल, उंदीर अन् दोरी...

SCROLL FOR NEXT