Covid-19 Booster Vaccination saam tv
देश विदेश

COVID 19 Vaccine Booster: कोरोना लसीच्या बुस्टर डोसबाबत सरकारनं बदलले नियम, जाणून घ्या सविस्तर

COVID 19 Vaccine Booster| बुस्टर डोसबाबत सरकारचा मोठा निर्णय

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: कोरोना प्रतिबंधक लशीचा (corona booster vaccine) बुस्टर डोस घेण्याबाबतच्या नियमांमध्ये सरकारने बदल केला आहे. बुस्टर डोस आता ९ महिन्यांऐवजी ६ महिन्यानंतर घेतला येणार आहे. जर तुम्ही लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तर, बुस्टर डोस घेण्यासाठी तुम्हाला ९ महिन्यांची वाट पाहावी लागणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, सरकारनं कोरोना प्रतिबंधक लशीचा बुस्टर डोस (COVID 19 Vaccine Booster) घेण्याबाबतच्या नियमांमध्ये बदल करून दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यातील कालावधी कमी केला आहे. दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोस घेण्यासाठी ९ महिन्यांऐवजी ६ महिन्यांनंतर हा डोस घेता येईल. १८ ते ५९ वयोगटातील नागरिक आता ९ महिन्यांऐवजी ६ महिन्यांनंतर बुस्टर डोस (Booster Dose) घेऊ शकतात, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समूह (NTAGI) ने सरकारकडे कोरोना (Corona) प्रतिबंधक लशीच्या बुस्टर डोसच्या कालावधीसंदर्भात शिफारस केली होती. याशिवाय एनटीएजीआयने १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांनाही कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यासंदर्भात शिफारस केली आहे.

एनटीएजीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १७ वयोगटातील मुलांचे लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे. या वयोगटातील मुलांना १२ वर्षे वयोगटातील मुलांच्या तुलनेत अधिक धोका आहे. बुस्टर डोस म्हणून Corbevax च्या वापरासंदर्भात एनटीएजीआयकडून कोणतीही चर्चा झालेली नाही.

दरम्यान, कोरोनापासून (Covid 19) संरक्षण करण्यासाठी आतापर्यंत बुस्टर डोस घेण्याकरिता ९ महिने पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत होती. मात्र, सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर ज्यांनी दुसरा डोस घेतला आहे, त्या तारखेपासून सहा महिन्यांनंतर बुस्टर डोस घेऊ शकतात.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

Heart Health: व्यायाम करताना 'या' चुका टाळा, अन्यथा हृदयावर होतील होतील गंभीर परिणाम

Ladki Bahin Yojana: 'लाडकी'चा 4800 कोटींचा घोटाळा, कष्टकऱ्यांचे पैसे कुणाच्या खिश्यात?

Shocking : बॉयफ्रेंडशी भांडण, नैराश्यातून तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न, गळफास घेण्याआधी इंस्टाग्रामवर शेअर केली शेवटची पोस्ट

Dada Bhuse: मालेगावात शिक्षक भरती घोटाळा,शासनाला 2 कोटी 69 लाखांचा गंडा

SCROLL FOR NEXT