EPFO latest news  google
देश विदेश

नोकरदारांना मोठा झटका; PF वरील व्याजदर ४० वर्षांतील नीचांकीवर

EPFO धारकांसाठी गेल्या चाळीस वर्षांतील नीचांकी दराची नोंद करण्यात आलीय.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : केंद्र सरकारने (central government) २०२१-२२ साठी इपीएफओच्या (EPFO) डिपॉजीटवर ८.१ टक्के व्याजदर देण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच ग्राहकांच्या खात्यावर व्याज जमा केला जातो. इपीएफओने मार्च महिन्यातील २०२१-२२ या वित्तीय वर्षासाठी (Rate of interest) व्याजदर ८.५ टक्क्यांवरुन कमी करुन ८.१ टक्के केलं आहे. विशेष म्हणजे गेल्या चाळीस वर्षांतील हा नीचांकी दर आहे.

लवकरच खात्यात जमा होणार व्याज

आता पीएफवर (Provident Fund) मिळणारा व्याज कमी असल्याचे समजते. त्यामुळे डिसेंबर महिन्याच्या आधीच हा व्याज खात्यात जमा केला जाऊ शकतो. वित्त मंत्रालयाने मंजुरी दिल्यानंतर कधीही इपीएफओ सदस्यांच्या पीएफ खात्यात व्याज जमा केला जाऊ शकतो.

सर्वात नीचांकी व्याजदर

ईपीएफओने २०२१-२२ साठी पीफसाठीचा व्याजदर ८.१ टक्के केला आहे. विशेष म्हणजे १९७७-७८ नंतरचा पीएफवरील सर्वात कमी व्याजदराची नोंद करण्यात आलीय. यापूर्वी २०२०-२१ मध्ये ८.५ टक्के व्याजदर मिळत होता.२०२०-२१ या वर्षात पीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता. तर त्याआधी २०१९-२० साठी या ८.६५ टक्के हा व्याजदर कमी करुन ८.५ टक्क्यांवर आणला होता.

इथे गुंतवणूक केली जाते

इपीएफओ पीएफ खातेधारकांच्या खात्यात जमा केलेल्या पैशांची गुंतवणूक अनेक ठिकाणी करतात. या गुंतवणूकीतून मिळणाऱ्या नफ्याचा एक भाग खातेधारकांना व्याजदर म्हणून दिला जातो. आता इपीएफओ ८५ टक्के हिस्सा डेब्ट ऑप्शनमध्ये गुंतवणूक करतात. यामध्ये सरकारी सेक्युरिटीज आणि बॉंडचाही समावेश असतो. उर्वरीत १५ टक्के हिस्सा ईटीएफ मध्ये लावला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS: दुष्काळात तेरावा महिना...सराव सामन्यात संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, तीन सभा घेणार

Maharashtra Election : नाकाबंदी सुरू होती, कारमध्ये सापडलं घबाड, जळगावात २० लाख कॅश पकडली, आतापर्यंत ४ कोटी जप्त

Bigg Boss 18: सलमानच्या बिग बॉसमध्ये लागणार तडका; किम कार्दशियन घेणार वाइल्डकार्ड एन्ट्री?

VIDEO : आमदार शहाजी बापू पटलांचं मतदारांना भावनिक आवाहन; म्हणाले... | Marathi News

SCROLL FOR NEXT