CBSE 12th Board Result Out
CBSE 12th Board Result Out Saam Tv
देश विदेश

CBSE 12th Board Result Out: सीबीएसई १२ वी बोर्डाच्या निकालानंतर १० वीचाही लवकरच होणार जाहीर; कुठे आणि कसा बघाल निकाल

Vishal Gangurde

CBSE 12th Board Result Out News: १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी हाती आली आहे. सीबीएसई १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे. देशात १६ लाख ६० हजार ५११ विद्यार्थ्यांनी सीबीएसई १२ वी बोर्डाची परीक्षा दिली होती. देशात सीबीएसई १२ वी बोर्डाचा ८७ टक्के निकाल लागला आहे. (Latest Marathi News)

सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाही सीबीएसई १२ वी बोर्डाच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. मुली मुलांच्या तुलनेत ६ टक्क्याहून अधिक पास झाल्याचे समोर आले आहे.

यंदा संपूर्ण देशात पुण्याचा आठवा क्रमांक लागला आहे. पुण्याचा एकूण निकाल ८७.२८ टक्के निकाल लागला आहे. त्रिवेंद्रम या शहराचा निकाल ९९.९१ टक्के लागला आहे. यंदा देशात त्रिवेंद्रम शहराचा पहिला क्रमांक लागला आहे.

सीबीएसई १२ वी बोर्डाच्या परीक्षेत गेल्या वर्षी ९१.२५ मुले पास झाले होते. तर ८४.६७ टक्के मुली पास झाल्या होत्या. दरम्यान, सीबीएसआईचा १२ वीच निकाल पाहण्यासाठी cbse.gov.in आणि cbseresults.nic.in या दोन्ही वेबसाईटवर जाऊन पाहू शकता.

निकाल कसा पाहणार?

1. सीबीएसईचा १२ वी निकाल पाहण्यासाठी results.cbse.nic.in या cbse.gov.in या वेबसाईटवर जाऊ शकता.

होम पेजवर जाऊन, 'CBSE 12th Result Direct Link' वर क्लिक करा.

लॉग इन केल्यानंतर हॉल तिकीट क्रमांक, जन्मदिनांक याची नोंद करा.

त्यानंतर तुमचा निकाल सीबीएसई १२ वी बोर्डाचा निकाल पाहू शकता. तसेच डाऊनलोड देखील करू शकता.

सीबीएसई १० वी बोर्डाचा निकाल लवकरच जाहीर होणार

सीबीएसई १२ वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता सीबीएसई १० वीचा निकाल देखील लागणार आहे. अनेक इयत्ता सीबीएसई १० वी बोर्डाचे विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना आता लवकरच त्यांचा निकाल पाहायला मिळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prakash Shendge News | सुप्रिया सुळे आणि विशाल पाटील वंचित कसे? शेंडगेंचा संतप्त सवाल

Today's Marathi News Live : दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील संघर्ष वाढणार?

Weight Loss Drinks : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; ७ दिवसांत पोटावरील चरबी कमी होईल

Ujjwal Nikam Meet Raj Thackeray : उज्ज्वल निकम यांच्यासाठी राज ठाकरे सभा घेणार? शिवतीर्थावर चर्चा सुरू

CSK vs PBKS: चेन्नईच्या पराभवाचं नेमकं कारण काय? ऋतुराज गायकवाडने केला खुलासा

SCROLL FOR NEXT