हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपिन रावत यांचं निधन Saam Tv
देश विदेश

हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं निधन

हेलिकॉप्टरमध्ये वरिष्ठ अधिकारी होते असंही सांगण्यात येत आहे.

वृत्तसंस्था

बंगळुरु - भारताचे CDS बिपिन रावत (Bipin Rawat) यांचं हेलिकॉप्टर क्रॅश (Chopper Crash) झालं होतं. त्यात बिपिन रावत यांचं निधन झाले आहे. तामिळनाडूत ही दुर्घटना घडली आहे. चौदा जण या हेलिकॉप्टरमध्ये होते त्यातल्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये वरिष्ठ अधिकारी होते असंही सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर बिपिन रावत यांच्या पत्नीही त्या हेलिकॉप्टरमध्ये होत्या.

सीडीएस बिपन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर हवाई दलाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या हेलिकॉप्टरमधून रावत यांच्या पत्नीसह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. भारताचे पहिले आणि वर्तमान चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. त्यांनी 1 जानेवारी 2020 रोजी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद स्वीकारले होते. याआधी ते भारतीय लष्कराचे प्रमुख होते. रावत यांनी 31 डिसेंबर 2016 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत लष्करप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT