Three-Language Policy: SC Seeks Delay in CBSE Implementation for Class 6 Students Saam tv
देश विदेश

Three Language Policy: इयत्ता सहावीपासून 'त्रिभाषा धोरण' लागू करा; CBSE ला सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Supreme Court On CBSE’s 3 Language Policy: सर्वोच्च न्यायालयाने CBSE च्या 'त्रि-भाषा धोरणा'बाबत इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा देणारे निर्देश दिलेत. हे धोरण पुढील शैक्षणिक वर्षापासून लागू केले जावे, असे म्हटले आहे.

Bharat Jadhav

  • त्रिभाषा धोरण २०२७च्या शैक्षणिक सत्रापासून लागू करण्याचा विचार करा, अशी सूचना सुप्रीम कोर्टाने CBSEला केली

  • सहावीच्या विद्यार्थ्यांना या वर्षी त्रिभाषा धोरणातून एकवेळची सवलत देण्याचा पर्याय

  • CBSEने न्यायालयाच्या सूचनेवर विचार करून ताजी भूमिका मांडण्याचे सांगितले

शाळेत 'त्रि-भाषा धोरण' लागू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिलाय. त्रिभाषा धोरणाला विरोध करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 'त्रि-भाषा धोरण' लागू करणे २०२७ मध्ये सुरू होणाऱ्या पुढील शैक्षणिक सत्रापर्यंत पुढे ढकलण्याबाबत विचार करावा, असं याचिकेत म्हटलं होतं.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची व व्ही.मोहना यांचा समावेश असलेले खंडपीठासमोर या भाषा धोरणाला आव्हान देणाऱ्या सुनावणी झाली. न्यायमूर्ती बागची यांनी असे सुचवले की, या विलंबामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याही अवाजवी अडचणीशिवाय नवीन शैक्षणिक आवश्यकतांशी जुळवून घेण्यास मदत होऊ शकेल.

‘सध्याच्या विद्यार्थ्यांसाठी सवलत’

न्यायालयाने असेही नमूद केले की, सध्या इयत्ता सहावीत शिकत असलेल्या ज्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षात स्वेच्छेने तीन भाषांचा अभ्यास करायचा असेल, त्यांना तशी परवानगी दिली जाऊ शकते. सीबीएसईच्या (CBSE) वतीने बाजू मांडताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी युक्तीवाद केला की, मंडळ या सूचनेचा विचार करेल आणि न्यायालयासमोर एक नवीन निवेदन सादर करेल.

न्यायपीठाने स्पष्ट केले की, त्यांची निरीक्षणे केवळ सूचना होत्या आणि त्याचा पक्षकारांच्या कायदेशीर अधिकारांवर किंवा युक्तिवादांवर कोणताही परिणाम होणार नाही. या धोरणाशी संबंधित महत्त्वाच्या कायदेशीर प्रश्नांचा स्वतंत्रपणे विचार केला जाईल.

भाषा धोरण

सीबीएसईची भाषाविषयक चौकट ही शालेय शिक्षणाला ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२०’ आणि ‘शालेय शिक्षणासाठीची राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क (NCF-SE) २०२३’ यांच्याशी सुसंगत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. १५ मे रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे मंडळाने त्रि-भाषा रचना लागू केली आहे. यानुसार विद्यार्थ्यांना किमान दोन भारतीय भाषांचा अभ्यास करणे अनिवार्य असेल. हे धोरण १ जुलै २०२६ पासून इयत्ता ९ वीच्या वर्गासाठी लागू होईल.

कोणत्या भाषा शिकवल्या जातील

सीबीएसईच्या (CBSE) यादीत समाविष्ट असलेल्या भारतीय भाषांमध्ये हिंदी, संस्कृत, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, पंजाबी, गुजराती, ओडिया आणि आसामी इत्यादींचा समावेश आहे. दोन भारतीय भाषांनंतर तिसरी भाषा म्हणून किंवा अतिरिक्त चौथी भाषा म्हणून इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, अरबी आणि स्पॅनिश यांसारख्या परदेशी भाषांची निवड केली जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Crime: शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याची दादागिरी, तरुणाला बेदम मारहाण; नाकाचे हाड तोडले नंतर...

Mumbai: कामाठीपुराचा चेहरामोहरा बदलणार! ७३४ इमारतींचा होणार कायापालट; मुहूर्तही ठरला

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांनी आमच्या मागण्याची दखल घेऊन तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा...; दीपक बोराडे यांचा थेट सरकारला इशारा

Devendra Fadnavis vs Uddhav Thackeray : दुष्काळावरून फडणवीस-उद्धव ठाकरे आमनेसामने, कोण काय म्हणालं? पाहा व्हिडिओ

PF चे नियम बदलले, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT