SSC HSC Result Saam tv
देश विदेश

SSC HSC CBSE Result 2025 : दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिली अधिकृत माहिती

SSC HSC CBSE Result update : दहावी आणि बारावीचा निकालाबाबत अधिकृत माहिती हाती आली आहे. या निकालाबाबत बोर्डाने अधिकृत माहिती दिली आहे.

Vishal Gangurde

सीबीएसईचा १० वी आणि १२ वीचा बोर्डाचा निकाल कधी लागणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. २ मे रोजी ११ वाजता निकाल घोषित होणार अशी चर्चा सुरु झाली आहे. यावर सीबीएसईकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यावर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सीबीएसईच्या १० वी आणि १२ वीचे निकाल २ मे रोजी घोषित होणार नसल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

बिहार बोर्ड निकाल, उत्तर प्रदेश निकाल, आयसीएसई आणि आयएससी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त इतर राज्याच्या बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. तसेच निकालाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. सीबीएसईच्या १० वी आणि १२ वी बोर्डाची परीक्षा देणारे ४४ लाख विद्यार्थी बोर्डाच्या निकालाची वाट पाहत आहे.

सीबीएसई १० वी आणि १२ वी बोर्डाची परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. मात्र, बोर्डाकडून अद्याप निकालाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. दुसरीकडे सोशल मीडियावर आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. सीबीएसईच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, २ मे २०२५ रोजी १० वी आणि १२ वी रोजी बोर्डाचा निकाल जाहीर होणार नसल्याची माहिती दिली.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एका वृत्त वाहिनीला सांगितलं करी, 'निकालाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. निकालाची अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिकृत वेबसाईटवरील माहितींवर विश्वास ठेवा. निकालाशी निगडीत माहिती cbse.gov.in, cbseresults.nic.in आणि results.cbse.nic.in वर विश्वास ठेवावा. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये'.

दरम्यान, मागील वर्षी १३ मे २०२५ रोजी १० वी आणि १२ वीचे निकाल जाहीर झाले होते. १२ वीचा निकाल ८७.९८ टक्के लागला होता. हा निकाल २०२३ सालच्या निकालाहून चांगला होता. तर दहावीचा निकाल हा ९३.६० टक्के इतका होता. हा निकाल २०२३ च्या निकालाहून ०.४८ टक्के जास्त होता. यंदाही चांगला निकाल लागण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

SCROLL FOR NEXT