सीबीएसई अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली करण्यात आली.
ऑन-स्क्रीन मार्किंग (OSM) प्रणालीतील कथित अनियमिततेनंतर ही कारवाई झाली.
संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली
केंद्रातील मोदी सरकारनं केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाशी संबंधित प्रकरणी एक मोठी कारवाई केली आहे. सीबीएसईच्या ऑन-स्क्रीन मार्किंग (ओएसएम) प्रणालीमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेल्या कथित अनियमिततेनंतर सीबीएसईचे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव हिमांशू गुप्ता यांची बदली करण्यात आली आहे.
सीबीएसईकडून ऑन स्क्रीन मार्किगची प्रक्रियेत घोटाळा झाल्याचं समोर आल्यानंतर एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. ही समिती या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे. क्षमता विकास आयोगाच्या (CBC) अध्यक्षा एस. राधा चौहान या समितीच्या प्रमुख आहेत. गरज भासल्यास त्या इतर विभागांतील अधिकाऱ्यांची मदत घेतील.
यासह समितीला सचिवालयीन सहाय्य पुरवण्याची जबाबदारी क्षमता विकास आयोगाकडे सोपवण्यात आली आहे. ही समिती आपला तपास पूर्ण करून एका महिन्याच्या आत कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाला (DoPT) आपला अहवाल सादर करेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.