Russia-Ukraine war  Yandex
देश विदेश

Russsia-Ukraine: रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय तरुणांना पाठवणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश; सीबीआयची कारवाई

Russia-Ukraine war : रशिया-युक्रेनच्या युद्धात भारतीय तरुणांना पाठवलं जात आहे. परदेशात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळणार असल्याचं आमिष देत प्लेसमेंट एजन्सी तरुणांना रशियामध्ये पाठवत आहे. सीबीआयने या प्लेसमेंट एजन्सींचे रॅकेट बाहेर आणले असून देशभरातील १३ शहरांमध्ये छापे टाकले आहेत.

Bharat Jadhav

(सचिन गाड, मुंबई)

Indian Youth Recruit For Russian Army CBI Busted Racket :

नोकरीसाठी युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनमध्ये गेलेल्या भारतीय तरुणांचा मृत्यू झाल्यानंतर मानवी तस्करी करणाऱ्या प्लेसमेंट एजन्सी तपास यंत्रणांच्या रडारवर आल्या आहेत. याप्रकरणात सीबीआयने १३ शहरांमध्ये धाडी टाकल्या आहेत. सीबीआयने नोकरीच्या नावाखाली तरुणांना युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनला पाठविणाऱ्या रॅकेटचा पदार्फाश केलाय. मुंबईसह दिल्ली, त्रिवेंद्रम, चंदीगड, अंबाला मदुराई आणि चंदीगड शहरात एकूण १३ ठिकाणी सीबीआयने धाडी टाकल्या.(Latest News)

सोशल मीडियावरून होत होतेय जाहिरात

खासगी विसा कन्सल्टन्सी कंपन्या आणि त्यांच्या एजंट्सविरोधात मानवी तस्करी केल्याचा सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. आतापर्यंत ५० लाख रुपये रोकड, गून्ह्याशी निगडित कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाईल फोन, कॅम्प्युटर आणि सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे. अनेक संशयितांना सीबीआयने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान अशा धोकेबाज कन्सल्टंट एजन्सीच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन सीबीआयने नागरिकांना केलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, रशियात चांगल्या पगार मिळत असल्याचं आमिष दाखवून तरुणांना भुरळ घातली जात आहे. आतापर्यंत ३५ भारतीयांना नोकरीच्या नावाखाली युद्धग्रस्त रशिया आणि युक्रेनला पाठवल्याची बाब समोर आलीय. दरम्यान युद्धात पाठवण्यात आलेल्या तरुणांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीच्या नावाखाली भारतीय तरुणांना रशियात नेले जात आहे. रशियात गेल्यानंतर त्यानंतर त्यांना युद्धाचं प्रशिक्षण देऊन रशिया आणि युक्रेन सीमेवर युद्ध भूमीवर लढाईसाठी पाठवलं जात होते.या युद्धात काही भारतीय तरुणांचा मृत्यू झालाय.

रशिया-युक्रेन युद्धात हैदराबाद आणि गुजरातच्या तरुणाचा मृत्यू

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात हैदराबादमधील एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. या तरुणाला नोकरीच्या नावाखाली एजंटने फसवणूक करून रशियन सैन्यात भरती केले होते. या तरुणाचे नाव असफान असून तो हैदराबाद येथील रहिवाशी होता. सुरक्षा सहाय्यकाची नोकरी असल्याचं सांगत असफानला रशियन सैन्यात भरती करण्यात आले होते. याआधी गुजरातमधील २३ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT