CAA Implementation From Today News Saam Tv
देश विदेश

CAA Act Implementation: मोठी बातमी! देशभरात आजपासून CAA लागू, केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केली अधिसूचना

CAA Rule Implementation News in Marathi: एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या सीएए कायदा देशभरात लागू करण्यात आला आहे.

Satish Kengar

Citizen Amendment Act Implementation:

एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होत असलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) देशभरात लागू झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याबाबत अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. यासाठी या लोकांना केंद्र सरकारने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडच त्यांच्या भाषणांमध्ये अनेकदा नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्याबाबत बोलले आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे त्यांनी जाहीर केले होते.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या नियमांनुसार, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल. या सहा समुदायांमध्ये हिंदू, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध आणि पारशी यांचा समावेश आहे.  (Latest Marathi News)

केंद्र सरकारने सीएएशी संबंधित वेब पोर्टल तयार केले आहे. तीन शेजारील देशांतून येणाऱ्या अल्पसंख्याकांना या पोर्टलवर स्वतःची नोंदणी करावी लागेल आणि सरकारी तपासणीनंतर त्यांना कायद्यानुसार नागरिकत्व दिले जाईल.

दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएए लागू केल्याबद्दल केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, ''आधी मला नियम पाहू द्या. याबाबतची अधिसूचना अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. जर या नियमांनुसार लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवले जात असेल, तर आम्ही त्याविरोधात लढू. हे फक्त भाजपचे निवडणूक प्रचार करण्यासाठी आणलं गेलं आहे, दुसरं काही नाही.''

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की, मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी जाणीवपूर्वक सीएए कायदा लागू केला. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की,, “मोदी सरकारला डिसेंबर 2019 मध्ये संसदेने मंजूर केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायद्याचे नियम अधिसूचित करण्यासाठी चार वर्षे आणि तीन महिने लागले. पंतप्रधानांचा दावा आहे की, त्यांचे सरकार अतिशय प्रोफेशनल पद्धतीने आणि नियोजित वेळेत काम करते. सीएएचे नियम अधिसूचित करण्यासाठी लागणारा वेळ हे पंतप्रधान खोटं बोलत असल्याचं आणखी एक उदाहरण आहे.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Radhakrishna Vikhe Patil: विखेंचं शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ! कर्जमाफीवरून वादग्रस्त विधानानं पेटला वाद

Crime News : संतापजनक! क्लासवरून घरी येताना वाटेत गाठलं, ६ वर्षीय बालिकेवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार, नांदेड हादरलं

Maharashtra Politics: आदित्य ठाकरे मुंबईचे महापौर होणार? राजकीय चर्चांना उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाकडून संजय राऊत बरे होण्यासाठी महाआरतीचं आयोजन

Egg Safety Facts: अंडे का फंडा! अंडी फ्रिजमध्ये ठेवावीत की नाही?

SCROLL FOR NEXT