BUSINESSMAN GOPAL KHEMKA SHOT DEAD IN PATNA Saam tv news
देश विदेश

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Businessman Gopal Khemka: पाटण्यातील उद्योजक गोपाल खेमका यांची गोळ्या झाडून हत्या झाली. सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याचा थरार कैद झाला असून, पोलीस तपास सुरू आहे. आरोपी अद्याप फरार आहेत.

Bhagyashree Kamble

बिहारच्या पाटण्यात उद्योगपतीच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली. राजकारणी आणि व्यावसायिक गोपाळ खेमका यांच्यावर धाडधाड गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलं. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये घडलेली थरारक घटना कैद झाली असून, या फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आलं आहे. या थरारक व्हिडिओमध्ये खेमका कारमधून घराच्या दिशेनं येताना दिसत आहे. त्यांची कार गेट जवळ थांबते. नंतर दुचाकीवरून एक व्यक्ती येतो आणि खेमका यांच्यावर गोळीबार करून फरार होतो. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळावरून पोलिसांनी एक गोळी आणि कवच जप्त केले असून, पुढील तपास पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांसह एफएसएल टीमला घटनास्थळी बोलावून घेण्यात आलं आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. हा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, 'व्यावसायिक खेमका यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलं आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दुचाकीवरून येत खेमका यांच्यावर गोळीबार करत असल्याचं दिसून येत आहे'. दरम्यान, आरोपींनी खेमका यांच्यावर आरोपींनी गोळीबार का केला? या हत्येमागे कुणाचा हात? हत्या करण्यामागचं कारण काय? याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT