India-US Trade Saam Tv
देश विदेश

India America News : चीन राहिला मागे! आता अमेरिका आहे भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार; 78.31 अब्ज डॉलर्स गेली निर्यात

China News : चीन राहिला मागे! आता अमेरिका आहे भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार

Satish Kengar

Business News : चालू आर्थिक वर्षात अमेरिका हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार (India-US Trade) म्हणून उदयास आला आहे. याआधी भारताचा सर्वाधिक मोठा व्यापारी भागीदार हा चीन होता. मात्र आता अमेरिकेने चीनला मागे टाकलं आहे.

वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 2022-23 मध्ये 7.65 टक्क्यांनी वाढून 128.55 अब्ज डॉलर्स इतका झाला आहे. आर्थिक वर्ष 2021-22 हे 119.5 अब्ज डॉलर्स इतका होता. तर 2020-21 मध्ये भारत-अमेरिका व्यापार 80.51 अब्ज डॉलर्स इतका होता. (Latest Marathi News)

मिळालेल्याआकडेवारीनुसार, 2021-22 मधील 76.18 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत 2022-23 मध्ये भारतातून अमेरिकेला होणारी निर्यात 2.81 टक्क्यांनी वाढून 78.31 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. तर आयात सुमारे 16 टक्क्यांनी वाढून 50.24 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे.

भारत आणि चीनमधील व्यापार झाला कमी

चालू आर्थिक वर्षात भारताचा चीनसोबतचा द्विपक्षीय व्यापार 2021-22 मधील 115.42 अब्ज डॉलरच्या तुलनेत 1.5 टक्क्यांनी कमी होऊन 113.83 अब्ज डॉलरवर आला आहे. 2022-23 मध्ये भारतातून चीनला होणारी निर्यात जवळपास 28 टक्क्यांनी घसरून 15.32 अब्ज इतकी झाली आहे. तर गेल्या आर्थिक वर्षात आयात 4.16 टक्क्यांनी वाढून 98.51 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. व्यापार तूट 2021-22 मध्ये 72.91 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत गेल्या आर्थिक वर्षात 83.2 अब्ज डॉलर्स झाली.

तज्ज्ञांच्या मते, भारताचा अमेरिकेसोबतचा द्विपक्षीय व्यापार वाढवण्याची प्रक्रिया आगामी काळातही सुरूच राहणार आहे. कारण दोन्ही देशांची सरकारे आर्थिक संबंध मजबूत करण्यावर भर देत आहेत. फेडरेशन ऑफ इंडियन एक्सपोर्ट ऑर्गनायझेशन्सचे (FIEO) अध्यक्ष ए शक्तिवेल म्हणाले की, फार्मास्युटिकल्स, अभियांत्रिकी, रत्ने आणि दागिने यासारख्या वस्तूंच्या वाढत्या निर्यातीमुळे भारताला अमेरिकेत आपली शिपमेंट पुढे घेऊन जाण्यास मदत होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT