अजमेरच्या पुष्कर घाटात खासगी बस दरीत कोसळली; ३१ प्रवासी जखमी, एका बालकाचा मृत्यू.  Saam Tv News
देश विदेश

पुष्कर घाटात भीषण अपघात! 150 फूट खोल दरीत कोसळली ३१ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस

Bus Accident : अजमेरच्या पुष्कर घाटात एक खाजगी बस १५० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात एका निष्पाप मुलाचा मृत्यू झाला, तर बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले.

Bharat Jadhav

  • पुष्कर घाटात भीषण बस अपघात

  • १५० फूट खोल दरीत बस कोसळली

  • ३१ प्रवासी बसमध्ये, अनेक जखमी

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पुष्कर घाटात एक भीषण अपघात झाला आहे. पिसांगूनहून पुष्करकडे जाणारी एक खासगी बस अनियंत्रित होऊन १५० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात एका निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासगी बसमध्ये ३१ प्रवासी होते. पुष्कर घाट धोकादायक घाट आहे. येथील एका वळणावर बस पोहोचताच चालकाचे स्टेअरिंगचा ताबा सुटला. त्यामुळे बस खोल दरीत कोसळली.बस कोसळल्यानंतर प्रवाशांच्या किंकाळ्यांनी अख्खा घाट परिसर दुमदुमला.

स्थानिक लोक आणि पोलिसांकडून मदत कार्य सुरू

प्रवाशांच्या किंकाळ्यांनी परिसरात दुमदुमला होता. या आवाजामुळे स्थानिक लोक आणि इतर वाहन धारकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच पुष्कर शहरातील पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले. दरी खूप खोल असल्याने पोलिसांसाठी बचावकार्य आव्हानात्मक ठरले. मोठ्या प्रयत्नांनंतर पोलीस आणि गावकऱ्यांनी जखमींना बसमधून बाहेर काढले.

त्यांना रुग्णवाहिकेद्वारे पुष्कर सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अनेक जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. प्रथमोपचार दिल्यानंतर पाचपेक्षा जास्त गंभीर जखमी प्रवाशांना अजमेर येथील जवाहरलाल नेहरू (जेएलएन) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या मते अनेक प्रवाशी गंभीररिस्त्या जखमी झाले आहेत.

अपघात कशामुळे झाला?

पोलिसांनी बस ताब्यात घेतली असून तपास सुरू केला आहे. सुरुवातीला या अपघाताबाबत दोन मुख्य शक्यता वर्तवल्या जात आहेत. एकतर दरीतून खाली उतरताना बसचे ब्रेक निकामी झाले असतील. किंवा चालकाच्या निष्काळजीपणा अपघात झाला असावा. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस प्रवाशांचे जबाब नोंदवत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अडचणीत मित्र साथ देतील, महालक्ष्मींची कृपा राहील; ५ राशींच्या लोकांना अफाट धनसंपत्ती अन् प्रेम मिळणार

मराठीत 94 हजार विद्यार्थी नापास, मातृभाषेतच 8 टक्के मुलांची दांडी गुल

मी स्वत: वकील...; भाजपच्या विरोधात लढाई सुरू, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा

2 माजी संरक्षण मंत्र्यांना मृत्यूदंडाची शिक्षा, भ्रष्टाचाराविरोधात भारतात कडक कायदे कधी?

सुप्रिया सुळेंनी अपघात झाल्यानंतर ठेवलं स्टेटस अन् प्रवाशांना दिला महत्वाचा संदेश

SCROLL FOR NEXT