Bus Accident  Saam TV
देश विदेश

Bus Accident: बस दरीत कोसळली, भीषण अपघतात २४ जणांचा मृत्यू; पोलिसांच्या मते 'डेविल्स कर्व्ह'मुळे अपघात

पोलिसांनी घटनास्थळला डेविल्स कर्व्ह म्हणजेच सैतानी वळण म्हटलंय.

साम टिव्ही ब्युरो

Bus Accident: पेरूमध्ये बसला झालेल्या एका भीषण अपघातात २४ प्रवासांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. शनिवारी पहाटे अपघात झाला आहे. बसमधून एकूण ६० प्रवाशी प्रवास करत होते. पोलिसांनी याबाबतची माहिती स्थानिक माध्यमांना दिली आहे.

पेरूच्या वाहतूक एजन्सीने एका निवेदनात अपघाताची माहिती दिली . सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेरूच्या सुदूर उत्तरेकडील एल अल्टो जिल्ह्यात एका कंपनीच्या बसला अपघात झाला. बस पेरूची राजधानी लिमा येथून इक्वेडोरच्या सीमेजवळ असलेल्या तुंबेस प्रदेशासाठी निघाली होती. या दरम्यान हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, बचाव पथकांनी घटनास्थळी येत बचावकार्य सुरु केले. (Latest News)

सूत्रांनी यांनी सांगितले की, पेरूच्या उत्तरेकडील एल अल्टो जिल्ह्यातील कंपनीच्या बसला हा अपघात झाला. अपघातादरम्यान अनेक प्रवाशांनी बसमधून उडी मारून स्वत:ला वाचवले, मात्र बहुतांश प्रवासी आत अडकले. पोलिसांनी घटनास्थळाला डेविल्स कर्व्ह म्हणजेच सैतानी वळण म्हटलंय. पोलिस सध्या अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

बेजबाबदारपणे गाडी चालवणे आणि वेग हे पेरूमधील रस्ते अपघातांचे मुख्य कारण आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अपघात स्थळी मदत पोहोचण्यास उशीर होतो आणि म्हणूनच काही जखमींचा मदत पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT