Bull Attack Man : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं (Viral Video) व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात यातील काही व्हिडीओ हे मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. अनेकदा हिरो बनण्याच्या नांदात फजिती होणाऱ्या व्यक्तींचेही बरेच व्हिडीओ तुम्ही सोशल मीडियावर बघितले असतील. अशाच एका व्यक्तीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. (Bull Attack Man Viral Video)
या व्हिडीओ सदरील व्यक्ती हा एका बैलाची खोड काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र बैल त्याला असा धडा शिकवतो ज्याचा त्याने विचारही केला नसेल. बैलाला डिवचण्याचा प्रयत्न करत असलेल्या या व्यक्तीला बैल आपल्या पायाखाली चिरडतो. ब्रिटिश कॉमेडियन आणि अभिनेता रिकी गेर्वाईसने हा व्हिडिओ ट्विटरवर (Social Media) शेअर केला आहे. रिकी प्राणी हक्क कार्यकर्ता म्हणूनही ओळखला जातो.
नेमकं काय घडतं?
व्हायरल झालेल्या व्हिडीओत काळ्या रंगाचा शर्ट परिधान केलेला एक व्यक्तील बैलाच्या शिंगाला हात लावून त्याला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. या व्यक्तीच्या बाजूला बघ्यांची गर्दी आहे. हा बैलाशी संबधित कुठलातरी खेळ असावा असा अंदाज आहे. सुरूवातीला बैल या व्यक्तीने काढलेली खोड सहन करतो. मात्र, त्यानंतर बैलाला या व्यक्तीच्या कृत्याचा राग येतो. आपली खोड काढणाऱ्या या व्यक्तीला बैल अगोदर खाली पाडतो. त्यानंतर त्याच्या अंगावर पाय देऊन त्याला चिरडतो. (Bull Fight Viral Video)
इतकंच नाही तर, सदरील व्यक्ती गंभीर जखमी झाल्यानंतर बैल तेथून पळही काढतो. जेव्हा हा बैल या व्यक्तीला चिरडत असतो. तेव्हा आजूबाजूला असलेली इतर लोकं फक्त बघ्याची भूमिका घेतात. कुणाचीही या बैलाला अडवण्याची हिंमत होत नाही. गेर्वाईसने शेअर केलेल्या या व्हिडिओ क्लिपला ""बूम!" असे कॅप्शन दिले आहे. एका दिवसांत या व्हिडीओला जवळपास ३० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकरी यावर प्रतिक्रिया देत आहेत.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.