UP Crime News SaamTv
देश विदेश

Shocking Crime: विकृतीचा कळस! मित्रांना बायकोवर बलात्कार करायला सांगायचा, नवरा लाईव्ह व्हिडिओ बघायचा

UP Crime News: पती त्याच्या मित्रांना लैंगिक अत्याचार करायला सांगायचा. या मोबादल्यात मित्रांकडून पती पैसे घ्यायचा. हा किळसवाणा प्रकाराला कंटाळून अखेर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

Bhagyashree Kamble

उत्तरप्रदेशच्या बुलंदशहर येथील एक महिला तिच्या पती आणि मित्रांच्या क्रुरतेची बळी ठरली आहे. पती त्याच्या मित्रांना लैंगिक अत्याचार करायला सांगायचा. या मोबादल्यात मित्रांकडून पती पैसे घ्यायचा. हा किळसवाणा प्रकाराला कंटाळून अखेर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच न्याय मिळावा अशी मागणी केली.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले, '२०१० साली बुलंदशहरच्या गुलावठी येथील एका पुरूषासोबत लग्न झाले. लग्नानंतर २ मुलगा आणि २ मुलगी असे ४ मुले आहेत. पती कामानिमित्त सौदी अरेबियात राहतो आणि तिथे मेकॅनिक आहे. तो वर्षातून २ वेळा घरी येतो. महिलेने आरोप केला की, ४ मुले असूनही एक महिन्यांची गर्भवती आहे. कारण पतीचे मित्र घरी येतात आणि लैंगिक अत्याचार करतात. गेल्या ३ वर्षांपासून हा किळसवाणा प्रकार सुरू आहे, आणि पती सौदी अरेबियातून हे सगळं लाईव्हद्वारे पाहतो. मुलांसाठी गप्प राहिली होती. पण आता हद्द झाली आहे.'

मिंत्राकडून लैंगिक अत्याचार आणि मोबदल्यात पैसे

पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत महिलेने सांगितले, ३ वर्षांपूर्वी तिचा पती दोन मित्रांसह घरी आला होता. नंतर पतीने पत्नीला दोन मित्रांच्या स्वाधीन केलं. पैसे घेऊन पती निघून गेला. मात्र त्यानंतर दोघांनी लैंगिक अत्याचार केला. दोघेही बुलंदशहरचे रहिवासी असून, पती सध्या परदेशात आहे. दोघे मित्र घरी कधीही येतात आणि अत्याचार करतात. अत्याचार करत असताना, मित्र पतीला लाईव्ह व्हिडिओ दाखवतात. जर विरोध केला, तर मित्र मारहाण करतात.

महिलेने पतीला जाब विचारले असता, पैसे देत असल्याचं सांगत तिला गप्प बसण्यास सांगितले. काही कारवाई केल्यास घटस्फोट देईन, अशी पतीने धमकी दिली. मात्र, याच जाचाला कंटाळून तिने तिच्या पालकांसह बुलंदशहरचे एसपी यांची भेट घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवला असून, या प्रकरणाबाबत पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra School Holidays: शाळांच्या दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक जाहीर; शिक्षण विभागाचे परिपत्रक जारी

Manoj Jarange Patil: 'मराठ्यांविरोधात जाणाऱ्यांना 2029ला पाडणार'; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

'शिंदेंनी माझ्या नावे भाजपकडून 500 कोटी घेतले का?'दसरा मेळाव्यातून मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Who is Justice Shrihari Davare: उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांचा शिवसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या हाती घेतला धनुष्यबाण

Actress Death : आलियासोबत काम केलेल्या अभिनेत्रीचं अचानक निधन; सिनेसृष्टीवर शोककळा

SCROLL FOR NEXT