Bulandshahr Accident: Tractor-trolley carrying devotees collides with container, 8 dead, 43 injured. ANI
देश विदेश

Accident : भयंकर अपघात! ट्रॅक्टर-कंटेरनची भीषण धडक, ८ जणांचा मृत्यू, ४३ जखमी

road accident : बुलंदशहरमध्ये ट्रॅक्टर-ट्रॉलीला कंटेनरने मागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असून ४३ जण जखमी झाले आहेत. ट्रॅक्टरमध्ये तब्बल ६१ भाविक प्रवास करत होते.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

  • बुलंदशहरजवळ ट्रॅक्टर-ट्रॉलीला कंटेनरची भीषण धडक.

  • ८ भाविकांचा मृत्यू, ४३ जण गंभीर जखमी.

  • ट्रॅक्टरमध्ये एकूण ६१ प्रवासी होते, दर्शनासाठी जात होते.

  • पोलिसांनी कंटेनर चालकाला अटक केली, FIR दाखल.

Uttar Pradesh highway road accident devotees killed : उत्तर प्रदेशमध्ये रविवारी रात्री उशिरा ट्रॅक्टर आणि कंटेरनची भीषण धडक झाली. या अपघातात ८ भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर ४३ जण जखमी झाले आहेत. बुलंदशहरजवळ रनिया बायपासवर हा अपघात झाला. या अपघातानंतर महामार्गावर भयंकर वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदतकार्य सुरू केले. जखमींना तात्काळ जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रॅक्टरमध्ये ६१ लोक प्रवास करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरमधील सर्व ६१ प्रवासी कासगंजवरून जहारपीर (राजस्थान) येथे धार्मिक कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी कंटेनरने मागून जोरात धडक दिली. धडक इतकी भयंकर होती की ट्रॅक्टर जागेवरच पलटला. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर तब्बल ४३ जण जखमी झाले आहेत. जवळच्या सरकारी रूग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जातेय. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतकार्य केले आहे. मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवण्यात आले होते. पोलिसांनी कंटेनर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बुलंदशहरमध्ये रविवारी रात्री दोन वाजता अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तात्काळ घटनास्थळावर अरनियाचे पोलीस स्टेशनचे अधिकारी पोहचले. ट्रॅक्टर ट्रॉलीला डबल डेकर करून ६१ जण जहारपीर येथे दर्शनासाठी निघाले होते. त्यावेळी कंटेनरने जोरात धडक दिली. या अपघातात ४३ जण जखमी झाले आहेत. तर ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. १० लोक सुदैवाने सुरक्षित वाचले.

पोलिसांनी जखमींना कैलाश खुर्जा, सीएचसी जटिया आणि सीएचसी मुनी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. गंभीर जखमी असलेल्या रूग्णांना दुसऱ्या रूग्णालयात शिफ्ट करण्यात आले आहे. अलीगढ मेडिकल कॉलेजमध्ये सध्या काही रूग्णांवर उपचार सुरू आहे. पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. कंटेनगर हरियाणा येथील फरीदाबादमधील संदीप यांच्या नावावर असल्याचे समजतेय. पोलिसांनी चालकाला अटक केली असून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : बाप्पाच्या कृपेने ५ राशींचे भाग्य उजळणार, काहींना जाणवतील तब्येतीच्या तक्रारी; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Atharva Sudame: कोण काय करतो ते बघूया...; अथर्व सुदामेला असिम सरोदेंचा सपोर्ट, राज ठाकरेंना थेट फोन लावला...

Mumbai Traffic: गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीत मोठा बदल; अशी असणार मुंबई-पुण्याची वाहतूक व्यवस्था

Maharashtra Live News Update: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मित्रावर फसवणुकीचा गुन्हा

Maratha Aarakshan: मराठ्यांना आरक्षण मिळणार? आशिष शेलार यांनी स्पष्ट केली भाजपची भूमिका! म्हणाले...,VIDEO

SCROLL FOR NEXT