Budget 2023, Nirmala Sitharaman Speech
Budget 2023, Nirmala Sitharaman Speech ANI
देश विदेश

Budget 2023 : अर्थसंकल्पीय भाषणातील ठळक मुद्दे, वाचा सविस्तर

साम टिव्ही ब्युरो

सोनं, चांदीचे दागिने, सिगारेट महागणार, कस्टम ड्युटी वाढल्याने किंमती वाढणार

सोनं, चांदीचे दागिने, सिगारेट महागणार, कस्टम ड्युटी वाढल्याने किंमती वाढणार

तुुरुंगात असलेल्या गरीब कैद्यांना मिळणार आर्थिक मदत

गरीब कैद्यांना जामीन मिळवण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केली

मोबाईल फोन स्वस्त होणार?

देशात मोबाईल फोनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. मोबाईल फोन्सच्या भागांच्या आयातीवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव. बॅटरीजवरील कस्टम ड्युटी २.५ टक्क्यांनी कमी करण्याचा प्रस्ताव.

क्रेडिट रिव्हॅम्प स्कीमसाठी ९ हजार कोटींची तरतूद- अर्थमंत्री

छोट्या व मध्यम उद्योगांसाठी जाहीर करण्यात आलेली क्रेडिट रिव्हॅम्प स्कीम १ एप्रिलपासून अंमलात येणार असून त्यासाठी ९ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचा २ लाख कोटींच्या मोफत क्रेडिट गॅरंटी मिळण्यात फायदा होईल

युवकांना प्रशिक्षणासाठी ३३ स्कील डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी- अर्थमंत्री

युवकांना प्रशिक्षणासाठी ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना ४.० पुढच्या तीन वर्षांत लाँच केली जाईल. नोकरीवरच प्रशिक्षण, व्यावसायिक भागीदारी यासह नव्या व्यावसायिक गरजांनुसार युवकांचे कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात येईल. त्यासाठी विविध राज्यांमध्ये ३३ स्किल डेव्हलपमेंट सेंटर्सची उभारणी करण्यात येईल – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण

मशीनद्वारे मैला उचलण्याची नवी योजना आणली जाणार आणि युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करणार- अर्थमंत्री

मशीनद्वारे मैला उचलण्याची नवी योजना आणली जाणार आणि युद्धपातळीवर या योजनेची अंमलबजावणी करणार- अर्थमंत्री

पीएम आवास योजनेचं बजेट 66 टक्क्यांनी वाढवलं, रेल्वेसाठीही 2.4 लाख कोटींची तरतूद

पीएम आवास योजनेचं बजेट 66 टक्क्यांनी वाढवलं, रेल्वेसाठीही 2.4 लाख कोटींची तरतूद

एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी मोठी घोषणा

पुढच्या ३ वर्षांत केंद्राकडून ३८,८०० शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची एकलव्य मॉडेल निवासी शाळांसाठी भरती करेल. साडेतीन लाख विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात.

विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार करण्यात येणार-अर्थमंत्री

विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी तयार करण्यात येणार. 157 नवीन नर्सिंग कॉलेज बांधले जातील. शिक्षक प्रशिक्षणात सुधारणा करण्यात येणार.

कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिले जाणार - अर्थमंत्री

कृषी क्षेत्राशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिले जाईल.तरुण उद्योजकांद्वारे कृषी-स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी अॅग्रीकल्चर एक्सीलरेटर फंड तयार केला जाणार.

देशातील नागरिकांचं दरडोई उत्पन्न दुप्पट झालंय- अर्थमंत्री

देशातील नागरिकांचं दरडोई उत्पन्न दुप्पट झालंय. दरडोई उत्पन्न 1.97 लाख रुपये वार्षिक झाले आहे. यामुळे लोकांच्या राहणीमानावर दिसून येतो आहे.

रोजगाराच्या संधी वाढवता येतील यावर सरकारचा विशेष भर- अर्थमंत्री

चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा दर सुमारे ७ टक्के राहण्याचा अंदाज आहे. रोजगाराच्या संधी वाढवता येतील यावर सरकारचा विशेष भर आहे. भारताकडून G20 अध्यक्षपद ही एक मोठी संधी आहे आणि ती भारताची ताकद दर्शवते.

तरुणांच्या विकासावर सरकारचं विशेष लक्ष - अर्थमंत्री

तरुणांच्या विकासावर सरकारचं विशेष लक्ष आहे. लोकसहभाग अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. आर्थिक स्थैर्याकडे वाटचालीसाटी प्रयत्न करणार आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेची उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल - अर्थमंत्री

भारतीय अर्थव्यवस्थेमुळे भारताचा मान वाढला आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वोत्तम असेल: प्रल्हाद जोशी

नवी दिल्ली: यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प सर्वोत्तम असेल. हा अर्थसंकल्प गरीब, मध्यमवर्गीयांसाठीचा असेल- प्रल्हाद जोशी, संसदीय कामकाज मंत्री

कोविड १९ महामारीनंतर आता भारत सावरलाय : भागवत कराड

कोविड १९ महामारीनंतर आता भारत सावरलाय असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी म्हटलं. आर्थिक पाहणी अहवाल जर बघितला तर सर्वच क्षेत्र प्रगतीपथावर आहेत. २०१४ मध्ये १० व्या स्थानी असलेली भारतीय अर्थव्यवस्था आजघडीला पाचव्या स्थानी आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयात पोहोचल्या

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थमंत्रालयात पोहोचल्या

करदात्यांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता

करदात्यांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. यामध्ये कलम 80C, आयकर स्लॅबची मर्यादा बदलणे अपेक्षित आहे.

देशाचा अर्थसंकल्प आज सादर होणार

Budget 2023 : देशाचा अर्थसंकल्प आज सकाळी 11 वाजता सादर होणार आहे. देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत आज अर्थसंकल्प सादर करतील. करदाते, शेतकरी, उद्योग, कॉर्पोरेट असे प्रत्येकजण देशाच्या अर्थसंकल्पाची वाट पाहत आहे. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. त्यामुले सर्वसामान्यांसाठी यात मोठ्या घोषणांची सर्वांना अपेक्षा आहे.

आयकरातून सवलत मिळण्याची अपेक्षा

गेल्या अनेक अर्थसंकल्पातून आयकर सूट सवलतीबाबत नोकरदार वर्गाच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी आयकर सवलतीची व्याप्ती लहान व्यावसायिक तसेच नोकरदारांना वाढण्याची आशा आहे. गेल्या नऊ वर्षांपासून त्यात कोणताही बदल झालेला नाही.

बजेट कुठे पाहता येईल?

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण सकाळी ११ वाजल्यापासून सुरू होईल, तुम्ही ते संसद टीव्ही आणि दूरदर्शनवर हे भाषण थेट पाहू शकता. यासोबतच अर्थसंकल्प लाईव्ह तुम्ही साम टीव्हीच्या युट्यूब चॅनेल https://www.youtube.com/watch?v=s8T1MaWFS9c वर पाहू शकता.

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ पर्यंत ५३.४० टक्के मतदान

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Shweta Tiwari: सुपरबोल्ड श्वेता तिवारी; हॉट अदांनी उडवली झोप!

DC vs RR,IPL 2024: सामन्याआधीच राजस्थानचं टेन्शन वाढलं! दिल्लीच्या या स्टार खेळाडूंचं होणार कमबॅक, पाहा प्लेइंग ११

Voting Awareness : मतदान जनजागृतीसाठी गुरुजी बनले वासुदेव; भक्तीगीतांच्या माध्यमातून पटवताय मतदानाचे महत्त्व

SCROLL FOR NEXT