फाजिल्का, पंजाब: भारतीय सैन्य आपल्या देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यासाठी डोळ्यात तेल ओतून पहारा देत असतं. शेजारील देश पाकिस्तानातून (Pakistani) दहशतवादी हे भारतात दाखल होण्यासाठा ना-ना प्रकारच्या युक्त्या वापरत असतात. मात्र भारतीय सैन्यापुढे (Indian Army) त्यांचा टिकाव लागत नाही. असं असताना, पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील (Fazilka district, punjab) अबोहर सेक्टर अंतर्गत सीमावर्ती भागात भारताच्या हद्दीत बीएसएफच्या (BSF) जवानांना एक चार वर्षांची चिमुकली आढळून आली. भारतीय सैनिकांनी चिमुकलीला लडीवाळपणे वागवले आणि तिची विचारपूस केली. (BSF returns 4-year-old girl who had accidentally crossed border to Pakistan Rangers)
हे देखील पहा -
बीएसएफच्या जवानांनी त्या चार वर्षीय चिमुकलीची विचारपूस केली असता त्यांच्या लक्षात आलं की, ती चिमुकली पाकिस्तानची असून अनवधानाने बॉर्डर क्रॉस करुन भारतात आली होती. भारतीय सैनिकांनीही आपलं भारतीयत्वं दाखवत त्या चिमुकलीला तिच्या देशात सोडायचं ठरवलं. त्या पाकिस्तानी चिमुकलीला बुधवारी रात्री मानवतावादी आधारावर पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आले आणि तिला आपल्या घरी जाता आलं. एका प्रसिद्धी पत्रकात, बीएसएफने उघड केलं की, चार वर्षांच्या मुलीला पकडण्यात आलं होतं. प्राथमिक चौकशी दरम्यान, असे आढळून आले की ती अनवधानाने भारतीय हद्दीत आली. परंतु तिच्याकडून काहीही आक्षेपार्ह सापडले नाही त्यामुळे बुधवारी रात्री तिला पाकिस्तान रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आलं.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.