Brutal Crime In madhyapradesh Saam Tv News
देश विदेश

Brutal Crime: आधी मुंडन, नंतर जबरदस्तीनं शेण चारलं; चिखलात बसवून जमावाकडून २ तरूणांना मारहाण

Two Men Forced to Eat Cow Dung After Head Shaving: सीहोर जिल्ह्यात जमावाने दोन तरुणांवर अमानुष अत्याचार केला. त्यांचे मुंडण करून शेण खायला लावले. घटनेचा व्हिडिओ व्हायरल; सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली.

Bhagyashree Kamble

माणुसकीला काळिमा फासणारी घटना मध्यप्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील एका गावातून समोर येत आहे. एका जमावाने दोन तरूणांशी असभ्य वर्तन केलं आहे. सर्वात आधी त्यांनी तरूणांचे केस कापले, नंतर त्यांना शेण खायला दिलं. त्यांचा अपमान करण्यासोबतच त्यांना अमानुष मारहाणही केली. मात्र, यामागील अद्याप कारण समोर आलेले नाही. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिडिओमध्ये दिसणारे तरूण मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील एका गावातील असल्याची माहिती आहे. दोन्ही तरूणांसोबत अमानुष प्रकार रात्रीच्या सुमारास घडला. दोन तरूणांभोवती अनेक लोक बसलेले असल्याचं दिसत आहे. उपस्थित लोकांनी यादरम्यान, मोबाईल फोनचा टॉर्च चालू ठेवला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन्ही तरूणांना अर्धनग्न करून आधी जमिनीवर चिखलात बसवतात. नंतर दोन पुरूष एकत्र एका तरूणाचे मुंडन करताना दिसत आहे. यादरम्यान, व्हिडिओमध्ये आवाज ऐकू येत आहे. मुंडन केल्यानंतर त्यांना जबरदस्तीने गाईचे शेण खायला देण्यात आले आहे. उपस्थित असलेल्या काहींनी या घटनेचा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

दरम्यान, या अमानुष वागणुकीबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास कुणीही पुढाकार घेतलेला नाही. व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अमानुष प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT