बहीण आणि दाजी वारंवार घरी येतात म्हणून तरुणाने केली दाजीची हत्या! Saam Tv
देश विदेश

बहीण आणि दाजी वारंवार घरी येतात म्हणून तरुणाने केली दाजीची हत्या!

बहीण आणि दाजी वारंवार घरी येत असल्याने संतप्त झालेल्या २५ वर्षीय तरुणाने आपल्या दाजीला बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशात घडली आहे.

वृत्तसंस्था

बैतूल: मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात बहीण आणि दाजी वारंवार घरी येत असल्याने संतप्त झालेल्या २५ वर्षीय तरुणाने आपल्या दाजीला बेदम मारहाण करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी मध्यस्थी करताना त्या व्यक्तीची आईही जखमी झाली. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली.

हे देखील पहा :

मुलताई पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील लाटा यांनी सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 75 किमी अंतरावर असलेल्या बिछुआ गावात सोमवारी रात्री ही घटना घडली. मंगळवारी पोलिसांनी आरोपी दीपक कुमरे याला अटक केली आहे. त्याने सांगितले की, छिंदवाडा जिल्ह्यातील हिरावाडी गावात राहणारा विनोद पंडराम (३२) याचे लग्न आरोपी दीपकच्या बहिणीशी झाले होते.

दीपक बैतूल जिल्ह्यातील बिछुआ गावात आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. दाजी-बहिणीच्या घरी वारंवार येण्यावर दिपकचा आक्षेप होता. त्याने सांगितले की, विनोद काही दिवसांपूर्वी पत्नीसह पुन्हा सासरी आला होता. या मुद्द्यावरून सोमवारी आरोपी आणि विनोद यांच्यात वादावादी झाली. यानंतर आरोपीने दाजी विनोद याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली व यात विनोदचा जागीच मृत्यू झाला.

यावेळी दीपकच्या ६५ वर्षीय आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याही या मारहाणीत जखमी झाल्या. आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. पोस्टमॉर्टमनंतर विनोदचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील; वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Nandgaon Accident: महादेवाचं दर्शन घेऊन परताना अपघात; ट्रॅक्टर ट्रॉली २०० फूट खोल दरीत कोसळली

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT