Britain Middlesbrough Road Accident AI Image
देश विदेश

Accident News : भीषण अपघात! चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक; २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा जागीच मृत्यू

Car Accident News : ब्रिटनमधील मिडलसब्रोजवळ A66 महामार्गावर भीषण अपघात झाला. चुकीच्या दिशेने जाणाऱ्या कारची पोलिसांच्या वाहनाला धडक होऊन २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा मृत्यू झाला.

Alisha Khedekar

  • ब्रिटनमधील A66 महामार्गावर भीषण अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू

  • मृतांमध्ये गस्तीवर असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश

  • चुकीच्या दिशेने आलेल्या कारची पोलिसांच्या वाहनाशी धडक

  • पोलिसांचा पुढील तपास सुरु

ब्रिटनमध्ये शनिवारी पहाटे भीषण कार अपघातात २ पोलीस अधिकाऱ्यांसह ७ जणांचा मृत्यू झाला. मिडलसब्रोजवळील A66 महामार्गावर हा अपघात झाला. चुकीच्या दिशेने जाणाऱ्या एका कारची समोरून येणाऱ्या गस्तीवरील पोलीस वाहनाशी जोरदार धडक झाल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ५ जण प्रवास करत असलेली एक कार महामार्गावर चुकीच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून पोलीस वाहन येत होते. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. स्थानिक वेळेनुसार शनिवारी पहाटे ३ वाजून ३९ मिनिटांनी हा अपघात घडला. धडकेनंतर घटनास्थळी पोहोचलेल्या आपत्कालीन पथकांनी सर्व ७ जणांना मृत घोषित केले.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींपैकी काहींची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ज्या व्यक्तींची ओळख पटली आहे, त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरही हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक खासदार ॲना टर्ली यांनी या दुर्घटनेबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले की, क्लीव्हलँड पोलिस आणि इंडिपेंडंट ऑफिस फॉर पोलिस कंडक्ट (IOPC) यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

अपघाताचे नेमके कारण, वाहन चुकीच्या दिशेने कसे गेले आणि धडकेपूर्वी नेमक्या कोणत्या घटना घडल्या, याचा तपास सध्या सुरू आहे. या तपासात महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या अत्यंत दुःखद घटनेनंतर कोणत्याही प्रकारचे अंदाज, अफवा पसरवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बापरे! रेशनच्या तांदळात सापडली दातांची कवळी! धाराशिवमध्ये खळबळ

Pandharpur Corridor: कॉरिडॉरला स्थगिती देताच पंढरपूरसाठी मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय, काय आहे सरकारचा नवा प्लॅन

अमित शहांच्या मुंबई दौऱ्याआधीच फडणवीसांनी गाठली दिल्ली; भाजपमध्ये चाललंय काय? राजकीय घडामोडींमुळे चर्चेला उधाण

शेतकऱ्यांना सरकार देतेय पेन्शन; किती मिळतात पैसे, काय आहे अर्ज प्रक्रिया?

सांगलीत सापडली पेट्रोलची विहीर? राज्यात आता पेट्रोल स्वस्त होणार?

SCROLL FOR NEXT