france news saam tv
देश विदेश

President Macron and Brigitte: फ्रान्सच्या अध्यक्षांचं बायकोनं तोंड दाबलं

President Macron and Brigitte: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्रॉन यांच्या बायकोनं त्यांना चापट मारली... हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्यांच्या नात्याबद्दल उलट सुलट चर्चा सुरु झाली.. मात्र विमानात काय घडलं होतं? आणि फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या बायकोनं चापट का मारली? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Omkar Sonawane

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हे पत्नी ब्रिगिट मॅक्रोनसह व्हिएतनाम दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावेळी व्हिएतनामची राजधानी हनोई येथे विमानातून उतरताना इमॅन्युएलसोबत एक घटना घडली. ज्याची जगभर एकच चर्चा झाली.इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासोबत नक्की काय घडलं? पाहूयात..

पाहिलतं, विमानातून खाली उतरताना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल यांना कुणीतरी चापट मारण्याचा प्रयत्न केला... ती व्यक्ती दुसरीतिसरी कुणी नसून इमॅन्युएल यांची पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन होत्या. सुरुवातीला पत्नीच्या या वागणुकीनं इमॅन्युएल थोडेसे खट्टू झाले. मात्र व्हिडिओत हे सगळं दृश्य कैद होत असल्याचं कळताच त्यांनी समर्थकांना हात दाखवत, परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. आणि सगळे हाच प्रश्न विचारतायत की एका राष्ट्राध्य़क्षाला त्याच्या बायकोने का मारलं... त्याआधी मॅक्रोन दाम्पत्याबददल जाणून घेऊया.

ब्रिगिट आणि मॅक्रॉनची 'लव्ह'स्टोरी

नाटकाच्या आवडीमुळे ब्रिगिट आणि मॅक्रॉन एकमेंकाच्या संपर्कात

आंद्रे-लुईस ऑजिएरसोबत ब्रिगिट यांचा विवाह

2006 साली ब्रिगिट यांचा घटस्फोट

ब्रिगिट आणि इमॅन्युएल यांचं 2007 मध्ये लग्न

ब्रिगिट आणि इमॅन्युएल याच्यात वयात 24 वर्षांचं अंतर

घरच्यांचा आणि समाजाचा विरोध पत्करून इमॅन्युएल मॅक्रोन यांनी ब्रिगिट यांच्याशी विवाह केला. मग अशा पद्धतीनं दौऱ्यात इमॅन्युएल मॅक्रोन यांना ब्रिगिटनं चापट का मारली असावी? सुरुवातीला इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या कार्यालयानं हा एआयद्वारे तयार केलेला व्हिडिओ असल्याचं सांगितलं खर पण नंतर लगेच आपली चूक सुधारत ब्रिगिट या इमॅन्युएल मॅक्रोन यांच्याशी चेष्टामस्करी करत असल्याचं स्पष्ट केलं. आता या व्हीडीओमुळे एक वैश्विक सत्य सामोरं आलंय ते म्हणजे तुम्ही सामान्य घरातला असा वा एखाद्या देशाचे राष्ट्राध्यक्ष बायकोपुढं काहीच चालत नाही, हेच खरं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT