bride  Saam TV
देश विदेश

Bride Escape From Marriage : प्रियकराशिवाय राहू शकत नाही; लग्नमंडपातून नवरी पळाली

bride escape from marriage in bihar : बिहारमधून अजब प्रेमप्रकरण समोर आलं आहे. हळदीचा कार्यक्रम झाल्यावर लग्नमंडपातून तरुणी लग्नमंडपातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

Vishal Gangurde

Bihar bride escape from marriage :

बिहारमधून अजब प्रेमप्रकरण समोर आलं आहे. हळदीचा कार्यक्रम झाल्यावर लग्नमंडपातून तरुणी लग्नमंडपातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या तरुणीने प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न केलं, त्यानंतर पोलीस ठाण्यात पोहोचली. (Latest Marathi News)

'आज तक'च्या वृत्तानुसार, पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रियकराने तरुणीला घट्ट मिठी मारली. जोडपं मिठी सोडायलाच तयार नव्हतं. पोलिसांनी दोघांची घट्ट मिठी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणी आणि प्रियकराला सोडायलाच तयार नव्हती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

तरुणीच्या कुटुंबाने तिचं लग्न एका तरुणाशी करण्याचं ठरवलं होतं. यामुळे घरात लग्न कार्याची तयारी सुरु होती. तरुणीच्या लग्नामुळे घरातील मंडळी खूप आनंदी होते. या लग्नकार्यात अचानक प्रियकराची एन्ट्री झाल्याने घरातील आनंदी वातावरण अचानक टेन्शनमध्ये बदललं.

तरुणी लग्नाच्या ८ दिवस आधीच तरुणी प्रियकरासोबत फरार झाली. प्रियकरासोबत पळून जाऊन तिने लग्न केलं. घरात तरुणी दिसत नसल्याने तिच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरु केली. मात्र, घरात आणि परिसरात कुठेही नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत हरविल्याची तक्रार दाखल केली.

कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तरुणीचा तपास सुरु केला. त्यानंतर पोलिसांना ही तरुणी नवऱ्यासोबत गावातील एका घरात आढळली. त्यानंतर पोलिसांनी तरुणी आणि तरुणीला ताब्यात घेतले. पोलिसांनी तरुणाची चौकशी सुरु केल्यानंतर तिने त्याला घट्ट मिठी मारली. ते दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते.

दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारल्यानंतर पोलिसांनी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये आम्ही मरू, पण एकमेकांना सोडणार नाही, असं ते बोलताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: अर्थसंकल्पाआधी सोनं स्वस्त! १० तोळ्यामागे ₹८६,२०० ची घट, वाचा 22k, 24k गोल्डची प्रति तोळा किंमत

Kitchen Hacks : फ्रीज घाणेरडा आणि पिवळा पडलाय? 'या' टिप्स वापरून पुन्हा करा नव्यासारखा चकचकीत

IND vs NZ: शेवटच्या सामन्यासाठी टीम इंडियामधून कोणाचा पत्ता होणार कट? 'या' २ खेळांडूंना संधी मिळण्याची शक्यता

Dark Underarms Tips: काखेतला काळवटपणा घालवण्यासाठी या 5 टिप्स आजपासूनच फॉलो करा

NCP Reunion: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, अजितदादांची इच्छा; १२ तारखेला निर्णय जाहीर होणार होता, शरद पवारांचा गौप्यस्फोट

SCROLL FOR NEXT