Bride Died On Marriage Day Saam Tv
देश विदेश

Amroha News : लग्नाच्या दिवशीच नवरीचा मृत्यू; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा, हृदयद्रावक घटना

Uttar Pradesh News : लग्नाच्या दिवशीच एका कुटुंबावर दुःखाचा भलामोठा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.

Satish Daud

Bride Died On Marriage Day : लग्न म्हटलं की गडबड गोंधळ आलाच. लग्नाच्या दिवशी प्रत्येक कुटुंबीयांमध्ये आनंदाचं वातावरण असतं. थाटामाटात आपल्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न होईल, अशी आस घरातील लोकांना असते. मात्र, लग्नाच्या दिवशीच एका कुटुंबावर दुःखाचा भलामोठा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. (Latest Marathi News)

एका शेतकऱ्याच्या 20 वर्षीय मुलीचा लग्नाच्या दिवशीच मृत्यू झाला. उत्तरप्रदेशातील अमरोहा गावातील हसनपूर परिसरात ही दुर्देवी घटना घडली. कविता (वय 20 वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. लग्नाच्या दिवशीच नवरीचा (Birde) मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोतवाली परिसरातील रुस्तमपूर खादर गावात शेतकरी चंदकिरण हे कुटुंबासह राहतात. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांची मोठी मुलगी कविता (20) हिचा विवाह हसनपूर तहसीलमधील रहिवासी मिंटू सैनी याच्याशी होणार होता.

मात्र,  लग्नाच्या (Marraige) आधीच कविता तापाने फणफणली. तिला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आलं. कवितावर गेल्या ५ दिवसांपासून मुरादाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. येत्या १५ मार्च रोजी तिचा विवाह होणार होता.

इकडे लग्नाची तारीख जवळ येत होती. दुसरीकडे, कविताच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. दुर्देवी बाब म्हणजे विवाहाआधीच तिला मृत्युने कवटाळलं. तापामुळे लग्नाच्या दिवशीच तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूने दोन्ही कुटुंबातील लग्नाचा आनंद दुःखात बदलला.

दरम्यान, कविताची प्रकृती अधिकच बिघडल्याने डॉक्टरांनी कविताच्या जगण्याची आशा नसल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. त्यानंतर ज्या दिवशी कविताचं लग्न होणार होतं, त्याच दिवशी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही बाब कविताच्या नातेवाईकांना समजताच घरात शोककळा पसरली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनमाड-इंदोर रेल्वे जमीन अधिग्रहण प्रकरणी बाधितांची रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक निष्फळ

Nitish Kumar : डॉक्टर महिलेचा हिजाब ओढणं पडलं महागात; मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याविरोधात FIR

Couples Tips: सुखी संसाराचं सिक्रेट समजलं, नवरा बायकोने रात्री झोपण्यापूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Famous Actress Death: 2025 मध्ये कोणत्या प्रसिद्ध अभिनेत्रींचे निधन झाले? संपूर्ण यादी

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंना जमीन मंजूर पण आमदारकी जाणार? VIDEO

SCROLL FOR NEXT