Amit Shah Saam Tv
देश विदेश

Ladakh New districts: ब्रेकिंग! आणखी ५ नवे जिल्हे, अमित शह यांची मोठी घोषणा!

New districts in the union territory Of Ladakh: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.

Gangappa Pujari

दिल्ली, ता. २६ ऑगस्ट २०२४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारने लडाखमध्ये पाच नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याची घोषणा केली आहे. झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग अशी या जिल्ह्यांची नावे आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत ट्वीट करुन माहिती दिली आहे. लडाखच्या लोकांच्या हितासाठी ही घोषणा करण्यात आल्याचे शाह म्हणाले.

लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मोदी सरकारने केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे लडाखच्या लोकांना फायदा होईल. लडाखच्या विकासासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, त्यासाठीच हा निर्णय घेत असल्याचे शहा म्हणाले.

अमित शहांची मोठी घोषणा

गृह मंत्रालयाने लडाखमध्ये पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. लडाखला विकसित आणि समृद्ध बनवण्याच्या पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या जिल्ह्यांमध्ये झंस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग यांचा समावेश आहे. हे नवीन जिल्हे प्रत्येक ठिकाणी प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतील. मोदी सरकार लडाखच्या लोकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असे ट्वीट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.

२०१९ मध्ये झाला होता केंद्रशासित प्रदेश

2019 मध्ये लडाखला जम्मू आणि काश्मीरपासून वेगळे करण्यात आले आणि तो एक नवीन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आला होता. त्यावेळी या केंद्रशासित प्रदेशात लेह आणि कारगिल हे दोनच जिल्हे होते. आता लडाखमध्ये आणखी पाच नवीन जिल्हे (झांस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग) तयार करण्यात आले आहेत.

मध्ये लडाखचे कारगिल आणि लेह जिल्ह्यांमध्ये विभाजन करण्यात आले. 1989 मध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये दंगली झाल्या होत्या. 1990 च्या दशकातच, लडाखला काश्मिरी राजवटीतून मुक्त करण्यासाठी लडाख स्वायत्त हिल विकास परिषद स्थापन करण्यात आली आणि 5 ऑगस्ट 2019 रोजी तो केंद्रशासित प्रदेश बनला. लडाख हा भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचा प्रदेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT