Breaking News Saam Tv
देश विदेश

Sharad Pawar News Today: शरद पवारांनी भाकरी फिरवली; सुप्रिया सुळेंकडे दिली राज्याची मोठी जबाबदारी

Sharad Pawar Big Breaking News: शरद पवार यांनी ही मोठी घोषणा केली आहे.

Rashmi Puranik

Political News: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी २ मे रोजी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी ५ मे रोजी पत्रकार परिषद घेत आपण राजीनामा मागे घेणार असल्याचं जाहीर केलं. (Breaking Marathi News)

त्यानंतर आज शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना मोठी घोषणा केली आहे. (Political News)

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल पटेल यांच्याकडे गुजरात, राजस्थान, झारखंड या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, सध्या तरी अजित पवार यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन

आज राष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने दिल्लीत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मोठी घोषणा केली. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. तसेच अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Neck Pain Relief: मोबाईल आणि लॅपटॉपच्या अतिवापरामुळे तुमचीही मान दुखतेय? 'या' 5 सवयी आजपासून बदला

Panvel Tourism : पनवेलमध्ये लपलाय निसर्ग सौंदर्याचा खजिना, वीकेंडला लोकल ट्रेन पकडा अन् थेट 'या' स्पॉटवर पोहचा

राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं, VIDEO

Maharashtra Live News Update : आरक्षण बचाव समिती आक्रमक; वर्गवारी थांबवण्यासाठी 8 एप्रिलला कल्याणमध्ये मोर्चा

DC vs MI Result : एकटा रिझवी भिडला, नडला! दिल्लीचा दणदणीत विजय; मुंबई इंडियन्सची सर्वात कमकुवत बाजू आली समोर

SCROLL FOR NEXT