Sonia Gandhi News AI Image
देश विदेश

Sonia Gandhi : आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, सोनिया गांधींच्या त्या विधानाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Sonia Gandhi On Indira Gandhi 1975 Aanibani : १९७५ च्या आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, याची इंदिरा गांधींनाही जाणीव झाली होती, असा दावा सोनिया गांधी यांनी केला आहे. राजीव गांधींचा विरोध आणि गांधी कुटुंबातील मतभेदांबाबत त्यांनी मोठा खुलासा केला.

Alisha Khedekar

  • १९७५ मध्ये लागू करण्यात आलेला आणीबाणीचा निर्णय चुकीचा

  • या निर्णयाबाबत इंदिरा गांधी यांनाही नंतर जाणीव झाली

  • आणीबाणीच्या निर्णयाला राजीव गांधी यांचा विरोध होता

  • सोनिया गांधी यांनी ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत हे खुलासे केले.

देशात १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी हा निर्णय चुकीचा होता, याची जाणीव तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही झाली होती, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. आणीबाणीच्या निर्णयाबाबत सोनिया गांधी यांनी प्रथमच सविस्तर भूमिका मांडल्याने राजकीय वर्तुळात या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.

सोनिया गांधी यांचे ‘बीलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येत आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी ‘द गार्डियन’ या वृत्तपत्राला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणी आणि गांधी कुटुंबातील मतभेदांवर भाष्य केले.

सोनिया गांधी यांनी मुलाखतीत म्हटले की, इंदिरा गांधी या मनाने लोकशाही मानणाऱ्या नेत्या होत्या. आणीबाणीच्या काळात घेतलेल्या निर्णयामुळे त्या स्वतःही आनंदी नव्हत्या. त्या निर्णयाचे ओझे त्यांच्यावर होते. आणीबाणी लागू करण्याचा निर्णय योग्य नव्हता, याची जाणीव त्यावेळी त्यांना झाली होती, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. विशेष म्हणजे, सोनिया गांधींच्या आणीबाणीच्या निर्णयाला गांधी कुटुंबातील सर्व सदस्यांचा पाठिंबा नव्हता.

सोनिया गांधी यांचे पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीही या निर्णयाला विरोध केला होता. त्यांनी इंदिरा गांधी यांना लगेच आणीबाणी लागू न करता पुढील निवडणुकीपर्यंत थांबण्याचा सल्ला दिला होता. मात्र, इंदिरा गांधी यांनी हा सल्ला मान्य केला नाही. या निर्णयामुळे कुटुंबातही तणाव निर्माण झाला होता, असे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. तसेच, आणीबाणीनंतर परिस्थिती आणखी बिघडू नये यासाठी नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. दरम्यान, आणीबाणीच्या मुद्द्यावरून भाजपकडून काँग्रेसवर वारंवार टीका केली जाते. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांच्या विधानामुळे पुन्हा एकदा हा जुना राजकीय विषय चर्चेत येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांच्या घरी देवेंद्र फडणवीस यांनी साजरी केलेली दिवाळी हा क्षण मनाला स्पर्श करणारा

Weight Loss Tea : वजन कमी करण्यासाठी 'हा' गुलाबी चहा ठरतो फायदेशीर, रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने पोटीची ढेरी होईल गायब

Diwali Weight Loss Tips: कितीही फराळ खाल्ला तरी वजन वाढणार नाही, फक्त घरी १० मिनिटं करा 'हा' एक व्यायाम

UPSC ची तयारी, KBC मध्ये सहभाग अन् शेवटी 'चोर'! बीटेक पदवीधराच्या अंगावर काटा आणणाऱ्या प्रवासाची थरारक कहाणी

Pune : पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वात मोठे बसस्थानक; 825 कोटींचा पुनर्विकास प्रकल्प

SCROLL FOR NEXT