Samajwadi Party MP Afzal Ansari News AI Image
देश विदेश

Political News : मोठी बातमी! खासदाराची अचानक तब्ब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात केले दाखल

Uttar Pradesh Political News : गाझीपूरचे समाजवादी पक्षाचे खासदार अफजाल अंसारी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Alisha Khedekar

  • गाझीपूरचे समाजवादी पक्षाचे खासदार अफजाल अंसारी यांची प्रकृती खालावली

  • तीन दिवसांपासून आहेत आजारी

  • लखनऊच्या मेदांता रुग्णालयात दाखल

उत्तर प्रदेशातील गाझीपूर लोकसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे खासदार अफजाल अंसारी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझीपूर येथून रुग्णवाहिकेने त्यांना लखनऊला आणण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अफजाल अंसारी यांना गेल्या तीन दिवसांपासून ताप येत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या छातीखाली आणि पोटाच्या वरच्या भागात दुखू लागले. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना पुढील उपचारांसाठी लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांच्या आजाराचे नेमके कारण समोर आलेले नाही.

अफजाल अंसारी यांचे पुतणे आणि आमदार अब्बास अंसारी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये अफजाल अंसारी यांची तब्येत अचानक बिघडल्याचे सांगितले. तसेच ते लखनऊच्या मेदांता रुग्णालयात उपचार घेत असल्याचे नमूद केले. यावेळी त्यांनी नागरिकांना अफजाल अंसारी यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.

अफजाल अंसारी हे उत्तर प्रदेशातील गाझीपूर मतदारसंघाचे खासदार असून, त्यांनी अनेक वर्षे राजकारणात काम केले आहे. त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ते समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाशी जोडले गेले. त्यांनी मोहम्मदाबाद विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार म्हणून काम केले आहे. तसेच गाझीपूर लोकसभा मतदारसंघातूनही ते अनेक वेळा निवडून आले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर गाझीपूर मतदारसंघातून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये सीएनजी दरात अचानक 5 रुपयांची वाढ

Gold Rate Today: दिवाळीपूर्वी सोन्याच्या दरात मोठा बदल, सोन्याचा भाव वाढला की घसरला; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं

Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा! आरोपींना मिळत होते तपासाचे धागेदोरे, कोण पुरवत होतं अपडेट्स?

SCROLL FOR NEXT