Vladimir Putin  SAAM TV
देश विदेश

Vladimir Putin: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना हृदयविकाराचा झटका?, प्रकृतीबाबत मोठी अपडेट आली समोर...

Vladimir Putin Health News: ७१ वर्षीय पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा क्रेमलिनच्या टेलिग्राम चॅनेलवरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

Priya More

Vladimir Putin Suffered Cardiac Arrest:

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (vladimir putin) यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. पुतिन यांना अचानक हृदयविकाराचा झटका (cardiac arrest) आला आणि ते त्यांच्या बेडरूममध्ये जमीनीवर पडल्याचे आढळून आले. ७१ वर्षीय पुतिन यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा दावा क्रेमलिनच्या एका इनसाइडरद्वारे चालवल्या जाणाऱ्या टेलिग्राम चॅनेलवरील पोस्टमध्ये करण्यात आला आहे.

टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआरने असा दावा केला की, पुतिन यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना ते त्यांच्या बेडरूममध्ये जमिनीवर कोसळलेल्या अवस्थेत आढळले. त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणा झाली. टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआर, नियमितपणे रशियन राष्ट्राध्यक्षांच्या आरोग्याबाबत अपडेट देत असते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जनरल एसव्हीआरने सांगितले की, मॉस्को वेळेनुसार रात्री 9 च्या सुमारास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेडरूममधून काहीतरी पडल्याचा आवाज ऐकायला आला. आवाज ऐकून दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ताबडतोब राष्ट्राध्यक्षांच्या बेडरूमच्या दिशेने धाव घेतली. त्यांना पुतिन बेडच्या शेजारी जमिनीवर पडलेले दिसले. त्यांच्या शेजारी असलेले टेबलही उलटे झाले होते.

असे सांगितले जात आहे की, 'जेव्हा राष्ट्राध्यक्ष जमिनीवर पडले तेव्हा त्यांनी टेबलला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे टेबलवरील भांडी खाली पडली आणि बेडरूममधून मोठा आवाज आला. या चॅनेलने दावा केला आहे की, 'पुतिन जमिनीवर चक्कर येऊन पडले होते आणि त्यांनी डोळे झाकलेले होते. राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी आणि शेजारच्या खोलीत ड्युटीवर असलेल्या डॉक्टरांना ताबडतोब बोलावण्यात आले. त्यांनी तात्काळ त्यांच्यावर उपचार सुरू केले.'

दरम्यान, टेलिग्राम चॅनेल जनरल एसव्हीआर हे माजी रशियन लेफ्टनंट जनरल चालवतात. पुतिन यांच्या तब्येतीच्या वाढत्या अनुमानांदरम्यान आणि कथित हत्येचा कट उधळून लावल्याच्या बातम्यांदरम्यान आता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली आहे. पुतिन यांच्या तब्येतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भाजप प्रवेशानंतर कैलास गोरंट्याल यांचं जालन्यात पहिल्यांदाच आगमन; कार्यकर्त्यांकडून स्वागत

PF Rules Payslip : कंपनीच्या पे स्लिपमध्ये PF रक्कम कमी का दिसते? यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

Yashasvi Jaiswal : यशस्वी भव! ओव्हलच्या मैदानात जैस्वाल शो, इंग्लंडच्या नाकावर टिचून ठोकलं शतक

Maharashtra Politics : काँग्रेसला राज्यात मोठा झटका! बड्या नेत्याचा उपमुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

Beed News: शाळा बनली कुस्तीचा आखाडा; शिक्षक आणि क्लर्कमध्ये हाणामारी पाहा,VIDEO

SCROLL FOR NEXT