CM Arvind Kejriwal reaction on ED summons delhi excise policy case  Saam TV
देश विदेश

Arvind Kejriwal News: ब्रेकिंग! दिल्लीचे CM अरविंद केजरीवाल १५ दिवस तुरुंगात

Arvind Kejriwal News: अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडीची मुदत संपली असून, आज कोर्टान केजरीवाल यांची १५ दिवस न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

Pramod Subhash Jagtap

Arvind Kejriwal Custody:

नवी दिल्ली :

कथित मद्यघोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. आज (१, एप्रिल) अरविंद केजरीवाल यांची ईडी कोठडीची मुदत संपत आहे. अशातच केजरीवाल यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दिल्लीच्या राऊज एव्हीन्यू कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सुनावणीत काय घडलं?

याबाबात अधिक माहिती अशी की, कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या ईडी कोठडीत आहेत. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची ईडी कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा राऊज एव्हीन्यू कोर्टात हजर करण्यात आले. सकाळी ११.३० वाजता या प्रकरणावर सुनावणी सुरू झाली असून कोर्टाने अरविंद केजरीवाल यांना कोणताही दिलासा न देता त्यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

१५ दिवसांची न्यायालयीन कोठडी..

मागच्या सुनावणी वेळी केजरीवाल यांनी स्वतः युक्तिवाद करत आपल्याला या प्रकरणात कसे अडकवले आहे हे कोर्टाला सांगितले होते. कोर्टाने यासंबंधी ईडीला नोटीस पाठवत उत्तर सादर करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. परंतु आजच्या सुनावणीनंतर कोर्टाने त्यांची १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

तिहार जेलमध्ये रवानगी होणार?

दरम्यान, दिल्लीच्या तिहार जेलमध्ये (Tihar Jail) आज जेल अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची तिहार जेलमध्ये रवानगी करण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार पाच नंबर जेलची स्वच्छता करण्यात आली असून केजरीवाल यांना तिहार जेलमध्ये हलवल्यास त्यांना पाच नंबरमध्ये ठेवलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Friday Release: हा विकेंड होणार धमाकेदार, 'या' आठवड्यात मिळणार सस्पेन्स आणि रोमान्सचा डबल डोस

Maharashtra Live News Update: दिवाळीपूर्वी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे पुण्यात मोठे "सर्च ऑपरेशन"

मैदा तुमच्या पोटात गेल्यावर पाहा किती नुकसान करतो, पाहा शरीरात कसे बदल होतात?

Diwali Cleaning Tips: दिवाळीपूर्वी घरातील हा कोपरा स्वच्छ करा, पैशांचा होईल वर्षाव

जेवणातील 'हे' पदार्थ चुकूनही पुन्हा गरम करू नये

SCROLL FOR NEXT