Bihar Political News  AI Image
देश विदेश

Political News : राजकारणात खळबळ! आमदाराची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी; नेमकं कारण काय?

Bihar Political News : बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड! जेडीयूने अनंत सिंह आणि नीलम देवी यांची सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. अनंत सिंह यांची आमदारकी रद्द करण्याची शिफारसही विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

Alisha Khedekar

  • बिहारच्या राजकारणात मोठी घडामोड!

  • जेडीयूने अनंत सिंह आणि नीलम देवी यांची पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी

  • उमेदवाराविरोधात प्रचार केल्याचा आरोप

  • अनंत सिंह यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्याची शिफारस

बिहारच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बिहार विधान परिषद निवडणुकीत जनता दल युनायटेडचे (जेडीयू) उमेदवार नीरज कुमार यांच्या विरोधात प्रचार करणे आणि पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाविरोधात चुकीचे वक्तव्य करणे आमदार अनंत सिंह यांना चांगलेच महागात पडले आहे. जेडीयूने अनंत सिंह आणि त्यांच्या पत्नी नीलम देवी यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे. तसेच अनंत सिंह यांची विधानसभा सदस्यता रद्द करण्याची शिफारसही विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.

जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाहा यांनी शनिवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला. पक्षाच्या आदेशांचे उल्लंघन करणे, वरिष्ठ नेतृत्वाबाबत चुकीचे आणि अपमानास्पद भाषा वापरणे तसेच विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात काम करणे, या कारणांवरून अनंत सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पक्षाच्या आरोपानुसार, अनंत सिंह यांनी जेडीयूचे उमेदवार नीरज कुमार यांच्याविरोधात प्रचार केला होता. तसेच दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. या प्रकरणाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर कारवाई करत, त्यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. याशिवाय, अनंत सिंह यांची विधानसभा सदस्यता तातडीने रद्द करण्याची शिफारस विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या आमदारकीबाबत पुढे काय निर्णय घेतला जातो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

अनंत सिंह यांच्या पत्नी नीलम देवी यांच्याविरोधातही जेडीयूने कठोर भूमिका घेतली आहे. त्यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांनाही सहा वर्षांसाठी पक्षातून हाकलवण्यात आले आहे. विधान परिषद निवडणुकीदरम्यान अनंत सिंह आणि जेडीयूचे उमेदवार नीरज कुमार यांच्यातील मतभेद उघड झाले होते. अनंत सिंह यांनी पटना पदवीधर मतदारसंघातून जन सुराजचे उमेदवार अनुज कुमार यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर जेडीयूने दोघांवरही कारवाईचा बडगा उगारला आहे. या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, अनंत सिंह यांच्या विधानसभा सदस्यतेबाबत विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

४ नोव्हेंबरपूर्वी ९२ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होणार; E-KYC करावी लागणार का? जाणून घ्या नवी अपडेट

Refrigerator Safety: गॅस शेगडीजवळ फ्रिज ठेवावा का? दोघांमध्ये किती अंतर असावं जाणून घ्या

Tiger Shroff Firing : "दिल्लीची बस चुकली आणि..."; टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील ३ शूटर्सच्या अटकेमागची थरारक इनसाईड स्टोरी

Maharashtra News Live Update: पहाटेच्या सुमारास वाकड परिसरातील सहा सात दुकानांना लागली भीषण आग

Heart Health: फक्त जेवणाच्या ताटात या 4 पदार्थांचा करा समावेश; हार्ट अटॅकचा धोका जवळही येणार नाही

SCROLL FOR NEXT