Delhi High Court Gets Bail Sharjeel Imam Saam TV
देश विदेश

Sharjeel Imam Bail : मोठी बातमी! शरजील इमामला दिल्ली उच्च न्यायालयाकडून जामीन; तुरुंगातून बाहेर कधी येणार?

Delhi High Court Gets Bail Sharjeel Imam : दिल्ली हायकोर्टाने शरजील इमामला जामीन मंजूर केला आहे.

Satish Daud

दिल्ली उच्च न्यायालयाने शरजील इमामला मोठा दिलासा दिला आहे. कोर्टाने बुधवारी शरजीलला जामीन मंजूर केला आहे. दिल्लीच्या जामिया परिसरात आणि अलीगढ मुस्लिम विद्यापीठात (एएमयू) प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी पोलिसांनी शरजीलवर गुन्हा दाखल केला होता. दिल्ली पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेने शरजीलला अटकही केली होती.

त्याच्यावर देशद्रोह आणि बेकायदेशीर कृत्ये केल्याचा आरोप करण्यात आला. २८ जानेवारी २०२० रोजी कोर्टाने शरजीलला ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. त्यानंतर शरजीलची रवानगी तुरुंगात करण्यात आली. दरम्यान, जामीनासाठी शरजीललने दिल्ली हायकोर्टात अर्ज केला होता.

आज त्याच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. शरजील इमामने ७ वर्षांच्या शिक्षेपैकी निम्मी शिक्षा भोगली असून त्याला जामीन मंजूर करावा, असा युक्तीवाद त्याच्या वकिलांनी केला. कोर्टाने त्यांचा युक्तीवाद मान्य करत शरजीलला जामीन मंजूर केला.

मात्र, कोर्टाकडून जामीन मिळाला असला, तरी सध्या त्याला तुरुंगातच राहावे लागणार आहे. कारण, दिल्ली दंगलीप्रकरणी शर्जील इमामवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणात त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही.

शरजील इमामच्या वकिलाने काय युक्तिवाद केला?

  • शरजील इमामच्या वतीने वकील तालिब मुस्तफा आणि अहमद इब्राहिम यांनी बाजू मांडली.

  • दिल्ली पोलिसांच्या वतीने एसपीपी रजत नायर कोर्टात हजर झाले होते.

  • वकिल मुस्तफा यांनी सांगितले की, UAPA प्रकरणात कोणत्याही आरोपीला जास्तीत जास्त ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

  • शरजीलने याआधीच ४ वर्षे आणि ७ महिन्यांची कमाल सात वर्षांची शिक्षा भोगली आहे.

  • त्यामुळे तो जामीनास पात्र असून शरजील इमामला जामीन द्यावा अशी मागणी वकिलांनी केली.

  • वकिल मुस्तफा यांची मागणी मान्य करत कोर्टाने शरजील इमानला जामीन मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism: लोणावळा-खंडाळाही पडेल फिकं! मालेगावपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे 'हे' हिल स्टेशन

Maharashtra Live Update: मनोज जरांगे पाटील यांना अचानक आली चक्कर

मतदान केलं त्यांनी निधी मागायचा नाही; मंत्री पंकजा मुंडेंची कुणाला तंबी?

Kishtwar Cloudburst: ६० जणांचा मृत्यू, २०० बेपत्ता; जेवणासाठी मोठी रांग, किश्तवाडमध्ये ढगफुटीनंतर भयावह वास्तव

लास्ट स्टेजमधील कॅन्सर बरा होऊ शकतो का?

SCROLL FOR NEXT