दिल्लीतील विश्वास नगर परिसरात गुरुवारी रात्री गोळीबाराची घटना घडली.
स्कूटीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी तीन गोळ्या झाडल्या.
हे कार्यालय प्रॉपर्टी डीलर कृष्णकांत आणि आप नेते अभिषेक यांच्याशी संबंधित आहे.
गोळीबारानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.
दिल्लीतील फर्श बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विश्वास नगर परिसरात गुरुवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. स्कूटीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्याच्या कार्यालयावर तीन गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास दोन तरुण स्कूटीवरून दक्ष रोड परिसरात आले. याठिकाणी असलेल्या श्री महाकाल प्रॉपर्टीज या कार्यालयाला त्यांनी लक्ष्य केले. त्यातील एका तरुणाने अचानक पिस्तूल बाहेर काढून सलग तीन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर दोघांनीही घटनास्थळावरून पळ काढला.
या कार्यालयात प्रॉपर्टी डीलर कृष्णकांत हे काम करतात. तर त्यांचे भाऊ अभिषेक हे आम आदमी पार्टीच्या युवा शाखेचे विधानसभा क्षेत्र अध्यक्ष असल्याची माहिती आहे. अभिषेक यांनीही याच ठिकाणी आपले कार्यालय सुरू केले आहे. त्यामुळे हा हल्ला नेमका कोणाला लक्ष्य करून करण्यात आला, याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच फर्श बाजार पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस उपायुक्त आर. पी. मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री नऊ वाजता गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
दरम्यान, हा गोळीबार वैयक्तिक वादातून झाला की यामागे अन्य काही कारण आहे, याचा शोध घेतला जात आहे. प्रॉपर्टी डीलर कृष्णकांत आणि आप नेते अभिषेक यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. त्यांचे कोणाशी जुने वाद किंवा वैर होते का, याचीही माहिती घेतली जात आहे. गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींची ओळख पटवून त्यांना पकडण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.