Ashok Siddharth announces retirement from active politics Saam tv
देश विदेश

Breaking News : मोठी बातमी! माजी राज्यसभा खासदारांनी जाहीर केली निवृत्ती; राजकीय वर्तुळात खळबळ

Uttar Pradesh Political News : बसपाचे माजी राज्यसभा खासदार अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. त्यांच्या निर्णयानंतर आकाश आनंद यांच्या बसपातील पुनरागमनाची चर्चा सुरू झाली आहे.

Alisha Khedekar

  • अशोक सिद्धार्थ यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर

  • मायावती यांच्या सल्ल्यानंतर त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाला वेगळे राजकीय महत्त्व

  • अशोक सिद्धार्थ यांच्या निर्णयानंतर आकाश आनंद यांच्या बसपातील पुनरागमनाची चर्चा

  • सुमारे ३५ वर्षांच्या राजकीय प्रवासाला अशोक सिद्धार्थ यांनी पूर्णविराम दिला.

बहुजन समाज पक्षात (BSP) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळाले आहे. बसपाचे माजी राज्यसभा खासदार आणि आकाश आनंद यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या घोषणेच्या अवघ्या एक दिवस आधी बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांना राजकारणातून निवृत्त होण्याचा सल्ला दिला होता.

‘बहनजीं’ची आज्ञा

निवृत्तीची घोषणा करताना अशोक सिद्धार्थ यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मायावतींबद्दल एक भावनिक आणि सविस्तर पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्यांनी मायावती आणि बसपाप्रती आपली दीर्घकाळाची निष्ठा व्यक्त केली. ‘बहनजीं’ची आज्ञा आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे सांगताना, त्यांच्या मार्गदर्शनापुढे कौटुंबिक नातेसंबंधही दुय्यम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आकाश आनंद यांच्या पुनरागमनाची शक्यता

गेल्या आठवड्यात मायावती यांनी आकाश आनंद यांना सर्व जबाबदाऱ्यांमधून हटवले होते. त्यानंतर बुधवारी मायावती यांनी आकाश आनंद यांना पुन्हा पक्षातील जबाबदारी देण्यासाठी त्यांचे सासरे अशोक सिद्धार्थ यांच्यासमोर एक महत्त्वाची अट ठेवली होती. अशोक सिद्धार्थ यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्यास, आकाश आनंद यांच्या राजकीय भवितव्याचा पुन्हा विचार केला जाऊ शकतो, असे मायावती यांनी संकेत दिले होते. त्यामुळे अशोक सिद्धार्थ यांच्या निर्णयानंतर आकाश आनंद यांचे बसपामधील पुनरागमन होण्याची शक्यता चर्चेत आली आहे.

३५ वर्षांच्या राजकीय प्रवासाला पूर्णविराम

अशोक सिद्धार्थ यांनी बसपातील आपल्या सुमारे ३५ वर्षांच्या प्रवासाचीही आठवण करून दिली. कांशीराम आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मिशन पुढे नेण्यासाठी एका सामान्य कार्यकर्त्याला संसद आणि विधानसभेपर्यंत पोहोचण्याची संधी मायावती यांनी दिली, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दरम्यान, आकाश आनंद यांना पुन्हा जबाबदारी द्यायची की नाही, हा पूर्णपणे मायावतींचा निर्णय असल्याचे अशोक सिद्धार्थ यांनी स्पष्ट केले. आपली निवृत्ती ही आकाश आनंद यांच्या पुनरागमनाशी जोडू नये, असेही त्यांनी नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bribe Case : गृहमंत्रालयातील २ अधिकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, FCRA प्रकरणात लाच मागितल्याचा आरोप

Maharashtra News Live Update: सचिन वाझेच्या जामिनाला स्थगिती

Cancer : पायात दिसणारी '४ सामान्य लक्षणं असू शकतात कॅन्सरचा संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Pitru Paksha : पितृपक्षात दिसणारे 'हे' ५ संकेत मानले जातात शुभ, पितरांचा मिळतो आशीर्वाद अन् अडथळे होतात दूर

Pradip Purnekar Case: प्रदीप पुर्णेकरांच्या हत्येमागं कुणाचा हात? ठाकरेंच्या नेत्याने थेट नाव सांगत केला धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT