Amit Shaha BJP News  AI Image
देश विदेश

Political News : भाजपसोबत आणखी एक पक्ष करणार युती, अमित शाहांनी दिले संकेत

Punjab Political News : पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी अमित शाहांनी मोठे विधान केले आहे. पंजाबमध्ये एनडीए सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले असून आता युतीच्या चर्चांना वेग आला आहे.

Alisha Khedekar

  • अमित शाह यांनी भविष्यात पंजाबमध्ये एनडीए सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला

  • भाजप आणि शिरोमणी अकाली दल पुन्हा युती करणार का, याबाबत राजकीय चर्चांना वेग

  • दोन्ही पक्षांकडून अधिकृत घोषणा नाही

पंजाबमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात युती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंजाबमध्ये एनडीए सरकार स्थापन होणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून चर्चांना उधाण आले आहे.

दिल्लीतील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी विरोधकांवर टीका केली. त्याचवेळी भविष्यात पंजाबमध्ये एनडीएची सत्ता येईल असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाचा अर्थ भाजप आणि अकाली दल यांच्यातील संभाव्य युतीशी जोडला जात आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून युतीबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

भाजप आणि शिरोमणी अकाली दल हे अनेक वर्षे पंजाबच्या राजकारणात एकत्र होते. मात्र, सप्टेंबर २०२० मध्ये केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करत अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या मैदानात उतरले. पुढे केंद्र सरकारने संबंधित कृषी कायदे मागे घेतले, तरी दोन्ही पक्षांमधील राजकीय अंतर कायम राहिले.

अलीकडच्या काळात दोन्ही पक्षांमधील संभाव्य जवळिकीबाबत चर्चा सुरू झाली आहे. अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी संसद भवन परिसरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने विविध चर्चांना उधाण आले. त्यानंतर त्यांनी परिसीमन विधेयकाला पाठिंबा देण्याची भूमिका मांडल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत.

निवडणुकीतील कामगिरी पाहता, स्वतंत्रपणे लढल्यामुळे दोन्ही पक्षांना मोठे यश मिळालेले नाही. २०२२ च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने ११७ पैकी ९२ जागा जिंकत बहुमत मिळवले. त्या निवडणुकीत अकाली दलाला तीन, तर भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपला पंजाबमध्ये एकही जागा मिळाली नाही, तर अकाली दलाने एक जागा जिंकली. दरम्यान पुढच्यावेळी असं होऊ नये यासाठी आता दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात. मात्र, जागावाटप, नेतृत्व आणि इतर गटांचा सहभाग यावरच पुढील राजकीय दिशा अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kojagiri Purnima : चंद्राच्या प्रकाशात ठेवलं जातं दूध, कोजागिरी पौर्णिमेची 'ही' अनोखी परंपरा तुम्हाला माहीत आहे का?

Gold Rate Today : सोने चांदीच्या दरात मोठे बदल! १ तोळा सोने १९०० रुपयांनी घसरले; वाचा 18K,22K, 24k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मराठवाडा पदवीधर निवडणुकीच्या मतदार यादीत मोठा घोळ, मविआचे उमेदवार दिलीप घुगे यांचा गंभीर आरोप

Washing machine detergent: वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना किती डिटर्जंट वापरावं? अनेकांकडून होते 'ही' चूक

Property Rules: बहिणीच्या संमतीशिवाय वडिलोपार्जित जमीन विकली, तुमच्यावर काय कारवाई होणार? कायदा काय सांगतो

SCROLL FOR NEXT