UP Factory Blast
UP Factory Blast Twitter/@ANI
देश विदेश

यूपीच्या हापूर कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, 20 जण होरपळले

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील हापूरमध्ये भीषण स्फोट झाला आहे. हापूरचे आयजी प्रवीण कुमार यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक उपकरण निर्मितीच्या युनिटमध्ये झालेल्या स्फोटात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 20 जण जखमी झाले आहेत. तर जखमींना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधितांवर कारवाई केली जाईल असही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

जिल्ह्यातील धौलाना भागात एक यूपीआयडी कारखाना आहे. तेथे केमिकल बनवले जाते. आज शनिवारी दुपारी अचानक कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. मोठा आवाज होऊन बॉयलर फुटल्याने ही आग लागली. काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले होते.

आगीचे उंच लोट पाहून आजूबाजूच्या लोकांमध्ये एकच खळबळ उडाली. अपघातावेळी कारखान्यात सुमारे 25 कामगार काम करत होते. या अपघातात आठ मजूर जिवंत जळाले, तर १५ मजूर गंभीररीत्या भाजले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा प्रयत्न सुरु आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Grapes Juice : द्राक्षाचा ज्युस प्या, मिळतील आश्चर्यकारक फायदे

Badam Oil : स्कीन केअरसाठी बदाम तेलाचे ६ आश्चर्यकारक फायदे

Mumbai News: मुंबईत चिकन शोर्मा खाऊन 12 जणांना विषबाधा, रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra Politics: मतांसाठी अजित पवारांची मतदारांनाच धमकी? संजय राऊतांचा गंभीर आरोप

Today's Marathi News Live:कल्याणमध्ये भटक्या कुत्र्याने घेतला चौदा जणांचा चावा; जखमीमध्ये 8 लहान मुलांचा समावेश

SCROLL FOR NEXT