YOUTH SETS HIMSELF ON FIRE OUTSIDE GIRLFRIEND’S HOUSE IN GWALIOR Saam
देश विदेश

Tragic Love: प्रेमसंबंधात कडाक्याचं भांडण, गर्लफ्रेंडच्या घरासमोरच पेटवून घेतलं; वेड्यासारखा सैरभैर फिरत राहिला

Tragic Love Dispute Turns Violent: ग्वाल्हेरमध्ये गर्लफ्रेंडच्या घराबाहेर स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाची धक्कादायक घटना; युवक गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल.

Bhagyashree Kamble

रिलेशनशिपमध्ये वारंवार वाद होत असल्यामुळे संतापून बॉयफ्रेंडने त्याच्या गर्लफ्रेंडच्या घराबाहेर स्वत:ला पेटवून घेतलं. स्थानिकांनी गंभीर अवस्थेत या तरूणाला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केलं. ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील एका गावात घडली असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली असून, पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अजय कुशवाहा (वय वर्ष २४) असे युवकाचे नाव आहे. तो ग्वाल्हेर जिल्ह्यातील सिकंदर कॅम्पजवळील पटिया वाले बाबा मोहल्ला येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. त्याची प्रेयसी त्याच्या घराजवळ राहत होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये टोकाचे भांडण सुरू होते. प्रेयसी अजयसोबत बोलत नव्हती.

त्यानंतर अजय रागाच्या भरात प्रेयसीच्या घराबाहेर जाऊन धिंगाणा घालायला सुरूवात केली. गर्लफ्रेंड बोलत नसल्यामुळे त्याने थेट अंगावर पेट्रोल ओतून घेतलं. तसेच स्वत:ला पेटवून घेतलं. ही संपूर्ण घटना शनिवारी १२:३० च्या सुमारास घडली. यानंतर स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याला तातडीने रूग्णलयात उपचारासाठी दाखल केलं.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय ७५ टक्के भाजला गेला आहे. यामुळे त्याची प्रकृती गंभीर आहे. यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सांगितलं की, 'हा तरूण शेजारच्या एका तरूणीवर प्रेम करीत होता. दोघांमध्ये वाद सुरू झाला. यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाल्यामुळे त्याने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला', असं पोलिसांनी सांगितलं. घटनास्थळी लोकांची चौकशी केली जात आहे. प्रेयसीचीही चौकशी केली जाईल. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT