Bride dance with boyfriend  Saam Tv
देश विदेश

Viral Video : बॉयफ्रेंडला लग्नात नाचताना पाहून नवरीचा संयम सुटला; पुढे जे घडलं ते कल्पनेच्याही पलीकडे

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...

Shivani Tichkule

Bride dance with boyfriend Viral Video : लग्न हा कोणाच्याही आयुष्यातला एक खास प्रसंग असतो आणि या निमित्ताने लोक खूप मजा करतात. विशेषत: लग्नातील डान्सबाबत लोकांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे आणि अशा परिस्थितीत सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात.

लग्नाच्या निमित्ताने लोकांची मस्ती, जोक्स, नवरीचा डान्स असे अनेक छोटे-मोठे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात, जे लोकांना खूप आवडतात. असाच एक डान्स व्हिडीओ (Dance Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक नवरी तिच्या नावरदेला सोडून चक्क तिच्या प्रियकरासह नाचताना दिसत आहे. (Tajya News)

हा व्हिडिओ एका लग्नाचा आहे. ज्यामध्ये राणी मुखर्जी आणि गोविंदाच्या 'तुझको ही दुल्हन बनाऊंगा' या प्रसिद्ध गाण्यावर नववधू तिच्या प्रियकरासोबत जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. पण अचानक नाचता नाचता प्रेयसीला भरून येतं आणि ती प्रियकराला मिठी मारते आणि रडू लागते.

प्रेयकराला देखील रडू कोसळतं आणि तो देखील तिला घट्ट मिठी मारून रडू लागतो. हे पाहून एक महिला त्या दोघांना सोडवण्यासाठी येते, पण वधू आणि तिचा प्रियकर एकमेकांना सोडायला तयार नाहीत. हा व्हिडिओ जॅकी यादव नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच, कॅप्शनमध्ये लिहिले होते- बंधूंनो, फक्त शोधा, वर जिवंत आहे की निघून गेला आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी भरभरून कमेंट करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : स्वाद अन् स्वास्थ्य दोन्ही उत्तम, 'ही' चटपटीत भेळ वजन कमी करायला करेल मदत

Lal Lal Kalarchi Bangadi Song Singer: 'लाल लाल कलरची बांगडी' सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या गाण्याचा गायक कोण आहे?

Maharashtra News Live Update: रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा विधान परिषदेसाठी नकार

India's Most Spoken Languages: भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती? मराठी भाषा कितव्या स्थानी?

Mumbai Water Cut : ७ मोठी धरणं तरीही मुंबईवर पाणीसंकट! १५ मेपासून १० टक्के कपात, सध्या किती आहे पाणीसाठा

SCROLL FOR NEXT