Operation Sindoor X
देश विदेश

Operation Sindoor नंतर मुलानं दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा, मुस्लिम तरुणानं केला चाकू हल्ला

Operation Sindoor News : भारताने मध्यरात्री हवाई हल्ले करत पाकिस्तानमधली दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारताच्या तिन्ही दलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशामुळे देशभरात जल्लोष साजरा केला जात आहे.

Yash Shirke

पहलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्याचा बदला घेत भारताच्या तिन्ही दलांनी २५ मिनिटांमध्ये पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या ९ बालेकिल्ल्यांवर हवाई हल्ला केले. ऑपरेशन सिंदूरनंतर लोक फटाके फोडून आणि मिठाई वाटून देशभरात आनंद साजरा केला जात आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

उत्तरप्रदेशातील शाहजहांपूरमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मोठा जल्लोष साजरा केला गेला. एका लहान मुलाने पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणा केली. यामुळे रागाच्या भरात एक मुस्लिम तरुणाने मुलावर चाकूने हल्ला केला. हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मुस्लिम तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मुलावर हल्ला झाल्यानंतर जमावाने तरुणाला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. बुधवारी (७ मे) पाकिस्तानवर झालेल्या हवाई हल्ल्याची माहिती पीडित मुलाला मिळाली. त्यानंतर मुलाने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या. तिथे उपस्थित असलेल्या मुस्लिम तरुणाला राग आला आणि त्याने लहान मुलावर धारदार अशा चाकूने हल्ला केला. पीडित मुलावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ वर्षीय सुरजीत ऑपरेशन सिंदूरनंतर हिंदुस्तान जिंदाबाद आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत होता. तेथे असलेल्या मोहीद खानने त्याच्या साथीदारासह सुरजीतवर हल्ला केला. हल्ल्यानंतर आसपासच्या लोकांनी सुरजीतला रुग्णालयात पाठवले आणि मोहीदला चोप देत पोलिसांकडे सुपूर्त केले. पोलिसांनी मोहिद खान आणि त्याचा साथीदार वसीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरु केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure: उन्हात गेल्यावर अचानक BP वाढतोय? वाचा रामबाण घरगुती उपाय

विद्यार्थ्यांना दरमहा 2500 रुपये मिळणार? विद्यार्थ्यांसाठी सरकारची नवी योजना?

Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

Maharashtra News Live Update: नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

SCROLL FOR NEXT