The Air India Boeing 171 moments before the crash , a still from the viral video shot by a local teen Saam Tv News
देश विदेश

Ahmedabad Airplane Crash: अहमदाबाद विमान अपघाताचा VIDEO शूट कुणी अन् का केला? 'तो' तरूण पोलिसांच्या ताब्यात

Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमधील एअर इंडिया विमान दुर्घटनेत २७५ लोकांचा मृत्यू झाला असून, गावातील एका मुलाने चित्रीत केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Bhagyashree Kamble

अहमदाबादमध्ये घडलेल्या एअर इंडिया विमान दुर्घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही सेकंदात अपघात घडला आणि होत्याचं नव्हतं झालं. या अपघातामुळे अनेकांच्या काळाजाचा ठोका चुकला. मृत्यूचं तांडव पाहिल्यानंतर नातेवाईकांनी आक्रोश व्यक्त केला. या अपघाताचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. व्हिडिओ शूट करणारा व्यक्तीही समोर आला आहे. सध्या चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, पुढील तपास सुरू आहे.

या भीषण अपघातात एअर इंडियाच्या बोईंग १७१ विमानातील २४१ प्रवाशांसह एकूण २७५ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडिओ नेमका कुणी चित्रित केला, त्याचं नाव देखील समोर आलं आहे. एअर इंडिया अपघाताचा व्हिडिओ एका स्थानिक मुलाने शूट केला.

आर्यन असे मुलाचे नाव असून, त्या मुलाने व्हिडिओ शूट करण्यामागचं कारण सांगितलं. फक्त उत्सुकतेपोटी आपल्या मोबाईलमधून उड्डाण करत असलेलं विमान शूट केलं आणि काही क्षणांतच त्या विमानाचा स्फोट झाला, असं त्याने सांगितलं.

एका वृत्तसंस्थेची बोलताना आर्यन म्हणाला, 'मी गावात राहतो. अहमदाबादमध्ये पाहुणा म्हणून आलो होतो. मी कधीही प्रत्यक्ष विमान पाहिलं नव्हतं. तेव्हा टेरेसवरून जेव्हा विमान उडताना दिसलं, तेव्हा मी मोबाईलमधून व्हिडिओ शूट करू लागलो. पण काही क्षणांतच विमान स्फोट झाला आणि मी घाबरलो', असं त्याने सांगितलं.

या घटनेनंतर आर्यनची अहमदाबाद गुन्हे शाखेकडून चौकशी केली जात आहे. तसेच, ज्या घरातून व्हिडिओ शूट करण्यात आला, त्या घरमालकासह आर्यनलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन केवळ साक्षीदार म्हणून त्याच्या वडिलांसोबत चौकशीसाठी आला होता आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं आहे. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे आर्यनवर आणि त्याच्या कुटुंबावर मानसिक दबाव आल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

WC Semifinal: मानधनाच्या विकेटवर भरमैदानात राडा; थर्ड अंपायरच्या निर्णयानं फलंदाजासह ग्राउंड रेफरीही बुचकळ्यात

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

SCROLL FOR NEXT