Boat Sink  google
देश विदेश

Boat Sink : मध्य आफ्रिकन रिपब्लिकमध्ये ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, ५० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

Boat Sink in Central African Republic : मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधून मोठी दुर्दैवी घटना समोर आली आहे. नदी ओलांडताना प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटचा अपघात झाला. या अपघातानंतर बोटमधील ५० प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधून मोठी दुर्दैवी घटना समोर आली आहे. नदी ओलांडताना प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बोटचा अपघात झाला. या अपघातानंतर बोटमधील ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ही अपघाताची घटना शुक्रवारी झाली असून प्रशासनाकडून मदतकार्य सुर आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य आफ्रिकन रिपब्लिकमधील मापोके नदीतून ३०० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट बुडाली. या दुर्देवी घटनेत ५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

बोट नदीत बुडाल्याची घटना शुक्रवारी घडली. बोट नदीत बुडाल्याने प्रवाशांचा मृत्यू झाला. गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांचे मृतदेह नदीतून काढण्याचे काम सुरु आहे. गावातील मुख्य व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना ३०० जणांना घेऊन जाणारी बोट नदीत बुडाली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने दिली.

या बोटमध्ये काही लोक उभे होते. तर काही बोटमधील लाकडाच्या सीटवर बसलेले होते. बोट निघाल्यानंतर काही मिनिटांनी बुडाली. ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर ४० मिनिटांनी स्थानिक मच्छिमार मदतीसाठी पोहोचले. या घटनेत काही जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर त्यांना उपचारासाठी रुग्णलयात हलविण्यात आलं आहे.

'या दुर्देवी घटनेनंतर ५८ जणांचे मृतदेह नदीतून काढले आहेत, अशी माहिती नागरी संरक्षण विभागाचे प्रमुख थॉमस डिजिमासे यांनी दिली. 'नदीत नेमकं किती जण पाण्यात आहेत, याची माहिती मिळाली नाही, असेही त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत गावगुंडांची दहशत; तरुणासह कुटुंबीयांवर जीवघेणा हल्ला, मारहाणीचा व्हिडिओ केला व्हायरल

Sawantwadi Tourism: पावसाला सुरुवात अन् कोकणातील बहरलेलं सौदर्य, विकेंडला सावंतवाडीतील या ७ ठिकाणी करा पिकनिक

Toilet Cleaning Trick: आठवड्यातून एकदा टॉयलेटमध्ये टाका बर्फ, व्हायरल ट्रिकने होईल चमत्कार

महिलांच्या बँक खात्यात येणार दरमहा ३,००० रुपये; भाजप सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत उष्माघाताचा पहिला बळी

SCROLL FOR NEXT