Blast in Pakistan
Blast in Pakistan Saam Tv
देश विदेश

Blast in Pakistan: पाकिस्तानच्या कराची विद्यापीठात स्फोट, चार चिनी नागरिक ठार, तीन जखमी

वृत्तसंस्था

कराची: पाकिस्तानातील कराची विद्यापीठात झालेल्या स्फोटात कारमध्ये धमाका झाला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटात ठार झालेले चारही लोक चीनचे नागरिक आहेत.

विद्यापीठाच्या कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ हा स्फोट झाला. स्फोटाच्या वेळी कारमध्ये चिनी लोक होते. या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये चिनी शिक्षक आणि चालकाचा समावेश आहे. स्फोटानंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. ही कार चिनी संस्थेची असल्याचे सांगण्यात आले.

प्राथमिक माहितीनुसार, स्फोटात जखमी झालेल्या तीन जणांमध्ये एक परदेशी नागरिक, एक रेंजर अधिकारी आणि एका सुरक्षा रक्षकाचा समावेश आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

मृतांमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे 1.52 वाजता कन्फ्युशियस इन्स्टिट्यूटजवळ एका कारमध्ये स्फोट झाला. कन्फ्यूशियस इन्स्टिट्यूट हे कराची विद्यापीठात चिनी भाषा शिकविण्याचे केंद्र आहे. स्फोटानंतर बचाव पथके आणि सुरक्षा कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. सध्या परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून लोकांना येथून दूर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Interview: पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? स्वत: मोदींच केला खुलासा

Today's Marathi News Live: अमोल किर्तीकर यांचा उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात रोड शो

Amravati Crime : अमरावतीत गुंतवणुकीच्‍या नावाखाली ऑनलाईन फसवणुक, 10 अटकेत; 31 लाख 35 हजार लाटले

Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या फक्त संपत्तीचे वारसदार; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका

Maharashtra Politics 2024 : '४ जूनला आमच्या शपथविधीला या'; उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं निमंत्रण

SCROLL FOR NEXT