Lok Sabha 2024 Saam Digital
देश विदेश

Lok Sabha 2024: पंजाबमध्ये भाजपची अकाली दलासोबतची चर्चा फिसकटली, आप, काँग्रेसच्या भूमिकेनंतर भाजपची रणनीती बदलली

Sandeep Gawade

Lok Sabha 2024

पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल आणि भाजप यांच्यातील युतीची चर्चा जवळपास फोल ठरली आहे. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने पंजाबमध्ये एकत्र निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यानंतर भाजपने रणनीती बदलली आहे. शेतकरी आंदोलन आणि शीख कैद्यांच्या सुटकेबाबत अकाली दलाकडून दबाव निर्माण केला जात होता. याशिवाय पंजाबचे भाजप नेतृत्वही युतीच्या जुन्या फॉर्म्युल्यानुसार अकाली दलाला जास्त जागा देण्याबाबत सकारात्मक नाहीत, सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि इतर प्रादेशिक पक्ष एनडीएमध्ये सामील होण्याच्या शक्यतेबाबत एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात अमित शहा म्हणाले होते की, आमचा कुटुंब नियोजनावर विश्वास आहे, पण राजकारणावर नाही. आमची युती वाढावी अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही नेहमी नवीन सहकारी पक्षांचं स्वागत करतो. जनसंघाच्या काळापासून आमची विचारधारा एकच आहे. ज्यांना आमच्यात सामील व्हायचे आहे ते येऊ शकतात. एनडीएमध्ये अकाली दलाच्या पुनर्प्रवेशाबाबत शहा म्हणाले की, चर्चा सुरू आहे, मात्र काहीही ठरलेले नाही.

गेल्या अनेक दिवसांपासून भाजप आणि अकाली दल यांची युती निश्चित असून त्याची घोषणा केव्हाही होऊ शकते, अशी चर्चा सुरू होती. मात्र, जागेबाबत अडचण असल्याने त्यावर चर्चा करावी लागली. आम आदमी पक्षाच्या सरकारच्या कथित अपयशाकडे जनतेचं लक्ष वेधण्यासाठी अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल सध्या 'पंजाब बचाओ यात्रे'त व्यस्त आहेत. या यात्रेदरम्यान ते बादल राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांपैकी पाच आणि 117 विधानसभा मतदारसंघांपैकी 45 मतदारसंघांचा दौरा करणार आहेत.

यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा दावा करत आहे. भाजप जरी एनडीएत घटक पक्षांना सामावून घेतं असलं तरी भाजपचा जुना सहकारी पक्ष अकाली दलासोबतची युती 2020 संपुष्टात आली होती. तीन कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या निषेधादरम्यान दोन पक्षांमध्ये मतभेद झाले उघडपणे मतभेत समोर आले होते.

यानंतर 2022 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाने स्वबळावर 'आप'चा मुकाबला केला, पण त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष मजबूत स्थितीत दिसत असल्याने राज्यात एकट्याने निवडणूक लढवणे सोपे नाही. दरम्यान आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लोकसभा निवडणूक लढवतील, त्यामुळे भाजप आणि अकाली दलाला फायदा होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT