Dharmendra Kashyap, Samajwadi Party Saam TV
देश विदेश

भाजपला जोरदार धक्का! माजी खासदार विरोधकांच्या पक्षात दाखल; मुलगी अन् शेकडो कार्यकर्त्यांसह सोडलं 'कमळ'

Dharmendra Kashyap, Samajwadi Party : उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी घडामोड! भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी मुलगी कीर्ती कश्यप आणि शेकडो समर्थकांसह अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.

Namdeo Kumbhar

उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीपूर्वी राजकीय पक्षांमध्ये उलथापालथ सुरू आहे. बरेलीच्या आंवला लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी आपल्या मुलीसह (कीर्ती कश्यप) आणि शेकडो समर्थकांसोबत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात (सपा) प्रवेश केला आहे. पक्षाध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना सदस्याता दिली. तसेच बसपचे नेते आबिद अली यांनीही इतर समर्थकांसह 'सपा'चा हात धरला आहे.

धर्मेंद्र कश्यप यांनी पक्ष बदलण्याची ही पहिली वेळ नाही. त्यांनी यापूर्वीही पक्ष बदलले आहेत. माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बसपामधून झाली. त्यानंतर त्यांनी समाजवादी पक्षात (एसपी) काम केले. पुढे ते भाजपमध्ये सामील झाले आणि दोनदा लोकसभेत निवडून आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सपा उमेदवार नीरज मौर्य यांच्याकडून पराभव झाला होता. पम ते आता पुन्हा एकदा सपामध्ये परतले आहेत.

धर्मेंद्र कश्यप २००२ मध्ये बसपाच्या तिकिटावर पहिल्यांदा विधानसभेत गेले होते. त्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. २००७ मध्ये ते पुन्हा सपाच्या तिकिटावर आमदार झाले. मुलायम सिंह यादव यांच्या सरकारमध्ये ते स्वतंत्र कार्यभारासह राज्यमंत्रीही झाले. २००९ मध्ये त्यांनी सपाच्या तिकिटावर आमला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, पण मेनका गांधी यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

२०१३ मध्ये भाजपमध्ये सामील झाल्यानंतर, त्यांनी २०१४ ची आमला मतदारसंघातून लोकसभा निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये ते सलग दुसऱ्यांदा खासदार झाले. २०२४ मध्ये सपाचे नीरज मौर्य यांनी त्यांचा १५,९६९ मतांनी पराभव केला. माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांच्यासोबत त्यांची मुलगी कीर्ती कश्यप यांनीही समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. कीर्ती कश्यप या २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत सपाकडून आपल्या राजकीय प्रवासाला सुरुवात करू शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.

माजी आयएएस राम बहादूर पासी, मुझफ्फरनगर लोकसभा आणि मेरठचे माजी उमेदवार दारा सिंग प्रजापती, बदाऊन बिसाउलीचे माजी आमदार कुशाग्र सागर, दातागंज बदाऊनचे माजी आमदार सिनोद कुमार शाक्य यांनी बसपासोडून सपामध्ये प्रवेश केला. अखिलेश यादव यांनी या सर्वांचे स्वागत केले. ​​केसी शाक्य, देवेश कुमार, प्रयागराजचे माजी आमदार अजय कुमार, सीतापूर सेवता विधानसभेचे बसपाचे उमेदवार चंद्रप्रकाश मिश्रा, भाजप नेते आणि एफसीआयचे संचालक शाहजहांपूर प्रदीप पांडे, माजी ब्लॉक प्रमुख तिल्हार सौरभ सिंह गांधी, रमाकांत गौतम, गौतम गौतम, श्रीश बहादूर यांनीही सपामध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्यात रॅपिडो बाइक टॅक्सीचा वापर करू नये; प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

Maharashtra Vidhan Parishad Election Result Live: पुणे पदवीधरसाठी मविआच्या हर्षदा देशमुख आणि स्मिता जाधव यांच्यात काटें की टक्कर

Sanjay Gandhi Niradhar Yojana: संजय गांधी निराधार योजनेबाबत मोठी अपडेट; या तारखेला खात्यावर जमा होणार हप्ता, अपडेट आली समोर

ओमराजे निंबाळकर यांच्यासह 6 खासदारांचे टेन्शन वाढलं? सुप्रीम कोर्टातून धक्कादायक माहिती समोर

Kitchen Tips: किचनमध्ये गॅस पाईपला आग लागली तर चुकूनही करू नका 'ही' चूक, अन्यथा...

SCROLL FOR NEXT