BJP Rajya Sabha candidate list 2026 latest news saam tv
देश विदेश

राज्यसभा निवडणुकीत भाजपचं धक्कातंत्र; उमेदवार यादी जाहीर, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?

Rajya Sabha Elections: राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमधून रुक्मिणी मल्लिक, तर उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 16 ऑक्टोबरला 12 जागांसाठी निवडणूक होणार आहे.

Omkar Sonawane

भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पक्षाने पश्चिम बंगालमधून रुक्मिणी मल्लिक, तर उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने दोन्ही उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यसभेच्या 12 जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील 10, उत्तराखंडमधील 1 आणि पश्चिम बंगालमधील 1 जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश आहे.

राज्यसभेच्या या जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यामध्ये सार्वधिक जागा उत्तर प्रदेशातील आहेत. उत्तर प्रदेशमधील 10 जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमधील एका जागेसाठीही मतदान होईल. या दोन्ही राज्यातील विद्यमान राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ 25 नोव्हेंबरला संपत आहे.

पश्चिम बंगालमधील जागेसाठी पोटनिवडणूक

पश्चिम बंगालमध्ये होणारी निवडणूक इतर जागापेक्षा वेगळी आहे. याठिकाणी राज्यसभेच्या एका जागेसाठी भाजपने रुक्मिणी मल्लिक यांना उमेदवारी दिली आहे. भाजपच्या या निर्णयाकडे पश्चिम बंगालमधील पक्षाच्या राजकीय रणनीतीचा एक भाग म्हणून पाहिले जात आहे.

उत्तराखंडमधून दिनेश आर्य यांना संधी

उत्तराखंडमधील एका राज्यसभा जागेसाठी भाजपने दिनेश आर्य यांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने त्यांच्या उमेदवारीला मंजुरी दिली आहे. निवडणुकीची तारीख जवळ येत असताना राज्यातील राजकीय हालचालींनाही वेग येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माशांच्या वासाचं कारण देत कोळी महिलांना BEST बसमध्ये प्रवेश नाकारला; मुंबईतील संतापजनक प्रकार

भीमाशंकरच्या जंगलात 32 हजार झाडांची कत्तल; टोरंट पॉवरसाठी 600 एकरवरील झाडांवर कुऱ्हाड

वाढत्या प्रदूषणाचा थेट मेंदूवर हल्ला; मुंबईकरांचा श्वास गुदमरला, काळजी घ्या

शिंदेच घेतायत 500 कोटींचा शोध, जरांगे आणि शिंदेचं नेतृत्व संपवण्याचा डाव-माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Weather Update: 70 kmच्या वेगानं वाहणार सोसाट्याचा वारा, होणार धुव्वाधार पाऊस; 13 राज्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

SCROLL FOR NEXT