Delhi Exit Poll Results Saam tv
देश विदेश

Delhi Exit Poll Results : केजरीवालांच्या AAP ला झटका, दिल्ली निसटणार? एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी

Delhi Exit Poll Results update : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये आपला झटका बसणार असल्याचा अंदाज समोर आला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजाने आप कार्यकर्त्यांची चिंता वाढली आहे.

Vishal Gangurde

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता एक्झिट पोलचे आकडेवारी समोर आली आहे. दिल्ली निवडणूक मतदानानंतर अनेक संस्थांनी जाहीर केलेल्या काही एक्झिट पोलमध्ये आम आदमी पक्षाला झटका बसताना दिसत आहे. काही एक्झिट पोलमध्ये भाजपला मोठा विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला किमान ४२ ते ५० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याच संस्थेच्या सर्व्हेनुसार, आम आदमी पक्षाला १८ ते २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काँग्रेसला शून्य ते २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला ३९ ते ४५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर आम आदमी पक्षाला २२ ते ३१ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला शून्य ते २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पी मार्क संस्थेचाही सर्व्हे समोर आला आहे. या संस्थेच्या सर्व्हेनुसार, भाजपला ३९ ते ४९ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आम आदमी पक्षाला २१ ते ३१ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. या व्यतिरिक्त काँग्रेसला १ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या चाणाक्य स्टॅटेजीसच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला ३९ आणि ४४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर आपला २५ ते २८ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच काँग्रेसला २ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दिल्ली सट्टा बाजारानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला ३८ ते ४० जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भाजपला ३० ते ३२ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर कांग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT